Pune Pimpri Chinchwad Crime News | मोबाईल देण्यास नकार दिल्याने मित्राचा महिलेवर चाकुने वार, वाकड परिसरातील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मोबाईल देण्यास नकार दिल्याने महिलेच्या मित्राने चाकूने गळ्यावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. तसेच महिलेची मावस बहिण सोडवण्यासाठी आली असता तिच्यावर देखील चाकूने वार करुन जखमी केल्याचा प्रकार काळेवाडी येथे घडला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.5) दुपारी तीनच्या सुमारास काळेवाडी येथील नढे कॉलनी येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अविनाश शिवाजी लोखंडे (वय-30 रा. गोळे वस्ती, भोसरी) याच्यावर आयपीसी 307 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी या त्यांच्या मावस बहिणीच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी महिलेचा मित्र असलेला आरोपी अचानक घरी आला. त्यावेळी महिला फोनवर बोलत होत्या. आरोपीने मोबाईलवर कोणाशी बोलत आहे असे म्हणत मोबाईल मागितला.

फिर्यादी यांनी आरोपीला मोबाईल देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादी यांना मर्डर करतो असे
म्हणत कमरेचा लोखंडी चाकू काढला. त्याने फिर्यादी यांच्या गळ्यावर चाकूने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी फिर्य़ादी यांची मावस बहिण सोडवण्यासाठी आले असता त्यांच्याही गालावर वार करुन गंभीर जखमी केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माने करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Fire News | महंमदवाडी येथील इमारतीच्या 11 व्या मजल्यावर भीषण आग

ACB Trap News | आदिवासी व्यक्तीकडून लाच स्वीकारताना लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात