Pune Pimpri Chinchwad Crime News | भांडणात मदत केली नाही म्हणून तरुणाला बेदम मारहाण, बाजीराव रोडवरील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | भांडण सुरु असताना मदत केली नाही याचा राग मनात धरुन तीन जणांनी एका तरुणाला दगड मारुन जखमी केले. हा प्रकार बाजीराव रोडवरील महाराणा प्रताप उद्याना समोरील चहाच्या टपरीजवळ मंगळवारी (दि.6) दुपारी तीनच्या सुमारास घडला. याप्रकरणी खडक पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत रोहित निलेश थोरात (वय-18 रा. पर्वती पायथा, दत्तवाडी, पुणे) याने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन तुषार यादव व त्याचे दोन मित्र (सर्व रा. पर्वती पायथा, पुणे) यांच्यावर आयपीसी 324, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी व त्यांचा मित्र चहा पिवून रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी आरोपी तुषार याने भांडण सुरु असताना मदत केली नाही म्हणून रस्त्यावर पडलेला दगड रोहितच्या डोक्यात मारला. यामध्ये तो जखमी झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

रोडवरील लाईट फिरवल्याने तरुणाला मारहाण

कोथरुड : रस्त्यावरील लाईट फिरवल्याच्या रागातून एका तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून गंभीर जखमी केले. हा प्रकार सोमवारी (दि.5) रात्री पावणे अकराच्या सुमारास कोथरूड येथील जयभवानी नगर येथील गल्ली नंबर 9 येथे घडला. याबाबत प्रथमेश राम कांबळे (वय-30) याने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून लोकेश दत्तात्रय पोळेकर (वय-24) याच्यावर आयपीसी 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी आणि फिर्यादी एकाच वस्तीत राहतात. प्रथमेश याच्या वडिलांनी रोडवरील लाईट फिरवल्याच्या रागातून
आरोपीने फिर्य़ादी यांना शिवीगाळ केली. तसेच तुझ्या बापाने मी फिरवलेली रोडची लाईट का सरळ केली असे म्हणत
लाईट कोण फरवत ते मी बघतो. माझ्या नादी लागु नको नाही तर लय मारीन. असे म्हणत आरोपीने त्याठिकणी
पडलेला सिमेंटचा गट्टू उचलून फिर्य़ादी यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalgaon Crime | वाळू माफियांचा उपजिल्हाधिकार्‍यांवर हल्ला ! उपजिल्हाधिकारी गंभीर जखमी, शासकीय वाहन, मोबाईल फोडला

पीडीसीसी बँकेच्या खिडकीचे गज तोडून चोरी ! ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस कार्यालयाची केली नासधूस

ACB Trap On Police | 15 हजारांची लाच स्वीकारताना स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यासह खासगी व्यक्ती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Lonavala Crime | लोणावळ्यात उच्च प्रतीचे विदेशी मद्य जप्त, राज्य उत्पादन विभागाची कारवाई

फेसबुकद्वारे मैत्री करुन तरुणीवर बलात्कार, मुंढवा परिसरातील प्रकार