Pune Pimpri Chinchwad Crime News | जखमी मित्राला नेण्यासाठी आलेल्या तरुणावर वार, कात्रज मधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | दगडाने व बाटली डोक्यात फोडल्याने जखमी झालेल्या मित्राला नेण्यासाठी आलेल्या तरुणावर टोळक्याने वार करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार 1 जानेवारी रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गोकुळनगर कात्रज (Gokul Nagar Katraj) येथील म्हसोबा मंदिरामागे घडला. याप्रकरणी 8 जणांवर गुन्हा (Pune Police) दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत जखमी शुभम बापु क्षीरसागर (रा. स्वामी समर्थ नगर, कात्रज-कोंढवा रोड, कात्रज) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन गणेश किरण होनइंगळे, भावड्या उर्फ धनंजय जगताप, आर्यन (पूर्ण नाव पत्ता माहित नाही सर्व रा. स्वामी समर्थ नगर लेन नं.1, गोकुळनगर, कात्रज) यांच्यासह इतर 5 जणांवर आयपीसी 307, 323, 504, 143, 144, 147, 148, 149 आर्म ॲक्ट (Arm Act) 4,(25) महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी शुभम याचा मित्र संकेत वाडकर याला हाताने, दगडाने व बाटली
डोक्यात मारुन बेदम मारहाण (Beating) केली. गंभीर जखमी झालेल्या संकेत याने फिर्यादी शुभम याला फोन करुन
मारहाण झाल्याचे सांगून ‘चक्कर येत आहे तू मला घ्यायला ये’ असे सांगितले.
त्यामुळे शुभम हा संकेत याला नेण्यासाठी त्याठिकाणी गेला असता आरोपींनी त्याला शिवीगाळ केली. तसेच हाताने दगडाने मारहाण करुन धारदार शस्त्राने गळ्यावर व गालावर वार करुन गंभीर जखमी (Seriously Injured) करत जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड (API Vishwas Bhabad) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

महिलेचा पाठलाग करून विनयभंग, पतीला मारहाण; कोंढवा परिसरातील घटना

पुणे : फिरायला नेण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Bhandara Sunflag Steel Company Blast | सनफ्लॅग कंपनीतील भीषण स्फोटाने भंडारा हादरला; ८ कामगार जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीची आत्महत्या, मंगळवार पेठेतील घटना; पतीवर FIR