Pune Pimpri Chinchwad Crime News | महिलेचा पाठलाग करून विनयभंग, पतीला मारहाण; कोंढवा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | विवाहित महिलेचा पाठलाग केला. तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग (Molestation) केला. तसेच महिलेचा पतीला शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा प्रकार कोंढवा परिसरात घडला आहे. याप्रकरणी चार जाणांवर गुन्हा (Pune Police) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन 2020 पासून वेळोवेळी व 1 जानेवारी 2024 रात्री साडे बाराच्या सुमारास उंड्री येथील हॉटेलमध्ये घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत कोंढवा येथे राहणाऱ्या 36 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन जयराज गायकवाड (रा. एन.आय.बी.एम. रोड, कोंढवा) याच्यासह त्याच्या इतर तीन अनोळखी मित्रांवर आयपीसी 354(अ), 354(ड), 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गायकवाड याने फिर्यादी महिलेचा वारंवार पाठलाग करुन बोलण्याचा प्रयत्न केला.
तसेच त्याच्या मित्रांना फिर्य़ादी यांच्याकडे पाहून अश्लील बोलून छेड काढली. 31 डिसेंबर (Thirty First) रोजी फिर्यादी
त्यांचे पती व मैत्रिणी उंड्री येथील एका हॉटेलध्ये जेवण करण्यासाठी गेले होते.
आरोपीने फिर्यादी यांचा पाठलाग करुन हॉटेलमध्ये आला.
फिर्यादी वॉशरुमला गेल्या असता आरोपीने पाठीमागून येऊन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी महिलेने बोलण्यास नकार दिला असता त्याने गैरवर्तन करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
तर आरोपी सोबत असलेल्या इतर तीन मित्रांनी फिर्यादी यांच्या पतीला शिवीगाळ केली. तसेच धमकी देऊन हाताने बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शेख (PSI Shaikh) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra IPS Officer Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील 5 पोलीस अधीक्षकांच्या बदल्या; पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील, बच्चन सिंग, श्रवण दत्त यांचा समावेश

थोपटे चौक ते भारत फोर्ज कंपनीकडे जाणारा रस्ता ‘या’ कालावधीत सर्व वाहनांसाठी बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

ट्रक चालकांच्या संपाला काँग्रेसचा पाठिंबा, जुलमी कायदा रद्द करा, नाना पटोलेंनी केली मागणी

कंपनीच्या ग्राहकांची माहिती घेऊन कमी दरात प्रोडक्टची विक्री, कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल; चाकणमधील प्रकार