Pune Pimpri Chinchwad Crime News | भांडण सोडवणाऱ्या तरुणाला काचेच्या बाटलीने मारहाण, तिघांवर FIR; हिंजवडी मधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मारहाण करणाऱ्यांच्या तावडीतून हॉटेल व्यावसायिकाला सोडवणाऱ्या तरुणाला काचेच्या बटलीने, लाकडी खुर्चीने डोक्यात मारहाण करुन जखमी केले. तसेच तरुणाला जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) दिल्याप्रकरणी तीन जणांवर हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (दि.7) मध्यरात्री साडे तीनच्या सुमारास हिंजवडी-वाकड रोडवरील इको लॉन्ज हॉटेलमध्ये घडला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत शिवम राज सिंग (वय-24 रा. विंग शगुन सोसायटी किवळे, मामुर्डी, देहुरोड) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अजित सदाशीव होके (वय-26 रा. भिमशक्तीनगर, निगडी), अशिष जयसींग आवारे (वय-28 रा. अभीजीत पार्क, थेरगाव), राकेश शिंदे व इतरांवर आयपीसी 324, 323, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवम सिंग व त्याचे मित्र अभिषेक रिहान, उज्जवल राज हे इको लॉन्ज हॉटेलमध्ये पार्टी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी हॉटेलचे मालक कौशल यांना मारहाण करत होते. त्यामुळे शिवम सिंग हॉटेल मालकाला सोडवण्यासाठी गेला. त्यावेळी आरोपींनी संगनमत करुन शिवम याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याठिकाणी असलेल्या काचेच्या बाटलीने, ग्लास व लाकडी खुर्चीने शिवमच्या डोक्यात मारहाण करुन जखमी केले. तसेच ‘तु बाहर मिल, तुझे जानसे मार दुंगा’ अशी धमकी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यलमार करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

नायजेरियनाकडून अमली पदार्थ आणुन विकणार्‍या दोघांना अटक

Maharashtra Police News | पोलीस सेवेत उत्कृष्ट कामगिरी केलीय; मग पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्हासाठी अर्ज केलात का

Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळवर गोळीबार करणार्‍यांनी दिल्या गुंडाच्या नावाने घोषणा; मामाच्या वादाचा बदल्याबाबत पोलिसांना संशय

Creative Foundation Pune | साधनांची कमतरता नाही गरज संस्कारक्षम पिढी घडविण्याची – चंद्रकांत पाटील

Pune Police Mcoca Action | मुंढवा परिसरात दहशत पसरवणाऱ्या सुमित उर्फ लखन गौड टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 112 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA