Pune Pimpri Chinchwad Crime News | साडे तीन वर्षानंतर उलगडले महिलेच्या खुनाचे रहस्य, पर्वती पोलिसांकडून आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पर्वती टेकडीवर पाण्याच्या टाकीजवळ मृतावस्थेत एका अनोळखी 30 ते 35 वर्षीय महिलेचा मृतदेह (Dead Body) आढळून आला होता. महिलेची ओळख पटली नाही, ना तिच्या मृत्यूचे कारण पोलिसांना (Pune Police) समजले होते. अखेर या खुनाचे रहस्य (Murder Mystery) उलगडण्यात पर्वती पोलिसांना यश आले असून खून करणाऱ्या आरोपीला बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. हा प्रकार 17 ऑगस्ट 2020 रोजी उघडकीस आला होता. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

दरम्यान, न्यायवैद्यक अहवालात (Forensic Report) महिलेच्या डोक्यात कठीण वस्तूने मारुन तिचा खून (Murder) केल्याचे समोर आले. यानंतर सव्वातीन वर्षांनी महिलेचा खून केल्या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे (Sr PI Jairam Paigude) करीत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मिसिंग महिलांचे रेकॉर्ड (Missing) बारकाईन तपासले. प्रत्येक शहर तसेच ग्रामीण हद्दीतील पोलीस ठाण्यातील मिसिंग रेकॉर्ड तपासण्यात आले. त्यावेळी पोलिसांकडे असलेल्या वर्णनाची महिला 12 ऑगस्ट 2020 रोजी घरातून निघून गेली व ती परत आली नाही म्हणून रोहन संतोष चव्हाण यांनी राजगड पोलीस ठाण्याच्या (Rajgad Police Station) अंकित असलेल्या खेड शिवापूर पोलीस आऊटपोस्ट (Khed Shivapur Police Outpost) येथे मिसींग तक्रार दाखल केल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी रोहन चव्हाण यांच्याकडे अधिक चौकशी केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे व
बातमीदाच्या मदतीने तपास करुन संशयित सागर दादाहरी साठे (वय 26 रा. सुतारदरा, कोथरुड मुळ रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्याने त्याच्या ओळखीची महिला सुरेखा संतोष चव्हाण (वय-36 रा. वेताळनगर, शिवापूर वाडा, ता. हवेली) हिचा तत्कालीन वादातून व पैशासाठी खून केल्याची कबुली दिली. कोणताही पुरावा नसताना पर्वती पोलिसांनी साडेतीन वर्षांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.

ही कावाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण
पाटील (IPS Praveen Patil), पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 सुहैल शर्मा (DCP Suhail Sharma),
सिंहगड विभाग (Sinhagad Division) सहायक पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे (ACP Appasaheb Shewale)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे
(PI Vijay Khomne), पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे (PSI Chandrakant Kamthe), पोलीस अंमलदार राजू जाधव,
कुंदन शिंदे, नवनाथ भोसले, प्रशांत शिंदे, दयानंद तेलंगे, अनिस तांबोळी, अमित सुर्वे, सद्दाम शेख, ज्ञानेश्वर शिंदे,
सुर्या जाधव यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Home Remedies For Snoring | ‘या’ 5 घरगुती उपायांनी होईल घोरण्याची समस्या कायमची दूर, घोरण्यापासून मिळेल लवकरच आराम…

Benefits Of Lukewarm Water | ‘हे’ आहेत रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे, आठवड्याभरात दिसून येईल परिणाम.

किरकोळ कारणावरुन कॉलेज तरुणांमध्ये राडा, तरुणाच्या डोक्यात वार; आण्णासाहेब मगर कॉलेज जवळील घटना