Pune Pimpri Chinchwad Crime News | कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याची आत्महत्या, वाकड परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | कंपनीत काम करत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ केला जात असल्याने कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide Case) केली. याप्रकरणी फ्रेश टू होम कंपनीच्या (Fresh to Home Company) चार अधिकाऱ्यांवर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 11 मार्च 2023 रोजी रहाटणी येथील नखातेनगर येथे घडला होता. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

प्रदीप अशोक देवताळे (वय-38 रा. नखातेनगर कमानीजवळ, रहाटणी) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अवधुत महादेव शिंगारे (वय-36) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) सोमवारी (दि.15) फिर्याद दिली आहे. यावरुन कंपनीचे अधिकारी अल्लुरी, अमन, किरण कापुरे, अनिकेत देशमुख यांच्यावर आयपीसी 306, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रदीप देवताळे हे फ्रेश टू होम कंपनीत मागील दीड वर्षापासून नोकरी करत होते. कंपनीत काम करत असताना त्यांचे सिनियर्स अल्लुरी, अमन यांनी प्रदीप यांना टार्गेट करुन त्यांचा मानसिक छळ केला. वरिष्ठांकडून होत असलेल्या सततच्या छळाला कंटाळून प्रदीप देवताळे यांनी नखातेनगर येथे राहत्या घरात 11 मार्च 2023 रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी स्वत: फिर्याद देऊन चार जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अवधुत शिंगारे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Accident News | भरधाव बसची दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू तर दोन पादचारी जखमी; कात्रज परिसरातील घटना

अमावस्या, पोर्णिमेला देवाला अंडी, सिगारेट, दारुचा नैवैद्य; मुलासाठी सुनेचा छळ, जादुटोणा कायद्याखाली पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

‘तू दादा झालास का’ म्हणत बिअरच्या बाटल्यांनी मारहाण, एकाला अटक; कर्वेनगर येथील घटना

इंन्स्टाग्रामवर ओळख करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, डेक्कन परिसरातील घटना

Pune Police Inspector Transfer | पुणे शहरातील 23 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे शहर वंचित बहुजन आघाडी कार्यकारी अध्यक्षावर स्टेशन परीसरात हल्ला