Pune Pimpri Chinchwad Crime News | मृत्यु पावलेल्या तरुणाची पत्नी असल्याचा बहाणा करुन जमिन हडपण्याचा प्रयत्न, महिलेवर गुन्हा दाखल

पुणे : दारुच्या व्यसनामुळे पत्नी वेगळी रहात असताना पोटाच्या आजाराने तरुणाचा मृत्यु झाला. त्यानंतर एका महिलेने त्याची पत्नी असल्याचा दावा करुन तरुणाची वडिलोपार्जित संपत्ती, जमिन बळकाविण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत सुनंदा बाळासाहेब गुंजाळ (वय ५८, रा. कांदळी, वडगाव, जुन्नर) यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात (Narayangaon Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी काजल संजय पवार (रा. वैषाखेडे, पिंपळवंडी, जुन्नर)हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एकट्याच राहतात. त्यांच्या दोन्ही मुलीचे विवाह झाले आहेत. त्यांचा मुलगा योगेश बाळासाहेब गुंजाळ याचे लग्न पल्लवी हिच्याशी झाले होते. त्यांचा दोन वर्ष संसार चालला. योगेशच्या दारुच्या व्यसनामुळे तिचे न पटल्याने ती २०१९ मध्ये माहेरी निघून गेली. योगेश हा नारायणगाव येथे राहू लागला. त्याने हॉटेल टाकले. पोटाच्या आजारामुळे योगेश याचे ४ फेब्रुवारी २०२३ रोजी निधन झाले. त्यानंतर काजल पवार ही योगेशची पत्नी म्हणवून घेऊ लागली. तिने काजल योगेश गुंजाळ या नावाने आधार कार्ड बनविले. काजल पवार हिचा ३ एप्रिल २०१८ रोजी विनोद चौधरी (रा. ठाणे) याच्याबरोबर विवाह झालेला होता. त्याच्यासोबत घटस्फोट झालेले नसतानाही ती योगेश याची पत्नी असल्याचा दावा करते आहे.

बनावट आधार कार्ड तसेच कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा वापर
करुन तिने योगेश याच्या नावावर असलेली कांदळी गाव येथील शेत जमिनीवर स्वत:चे नाव लावण्याचा प्रयत्न केला.
परंतु मंडल अधिकार्‍यांनी तिचा दावा फेटाळून लावला.
योगेश याच्या पासून तिला मुलगी झालेली नसतानाही त्याचीच मुलगी असल्याचा बनाव करुन
तिचे जन्म प्रमाणपत्रावर वडिल म्हणून योगेशचे नाव लावले आहे.
जुन्नर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक महादेव शेलार तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | बनावट वेबसाईट तयार करुन बुकिंग घेऊन अ‍ॅम्बी व्हॅलीची होतेय फसवणूक

Shivsena UBT Group | उद्धव ठाकरे गटाच्या १४ आमदारांना हायकोर्टाची नोटीस; ८ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे आदेश