Pune Pimpri Chinchwad Crime News | Google वर उच्चभ्रू परिसर सर्च करुन घरफोडी, येरवडा पोलिसांकडून परराज्यातील हायटेक चोरट्याला अटक; 3 गुन्हे उघड

Katraj Pune Crime News | Pune: Bharti Vidyapeeth Police nabs four men who were planning to commit a robbery, seizes 4 Koyta

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मोठ्या शहरांमध्ये जाऊन इंटरनेट वरुन उच्चभ्रू परिसर शोधून त्या ठिकाणी रेकी करून घरफोडी (Burglary) करणाऱ्या परराज्यातील चोरट्याला येरवडा पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने (Gold and Silver Jewellery) जप्त करुन तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. येरवडा पोलीस ठाण्यातील तपास पथकाने आरोपीला तेलंगणा येथून अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

नरेंद्र बाबु नुनसावत Narendra Babu Nunsawat (वय-27 रा. आरटीसी कॉलनी कमान, टीकेआर कॉलेज इंदिरानगर, मीरपेठ, हैदराबाद, तेलंगणा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर तेलंगणा (Telangana), हैदराबाद (Hyderabad), तिरुपति (Tirupati), चेन्नई (Chennai) या ठिकाणी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

येरवडा पोलीस ठाण्याच्या (Yerawada Police Station) हद्दीतील कल्याणीनगर येथील बंगल्याच्या खिडकीचे ग्रील उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले 7 लाख 54 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, अडीच लाख रुपये रोख रक्कम असा एकूण 10 लाख 4 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार 6 ते 8 ऑक्टोबर दरम्यान घडला होता. याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाने कल्याणीनगर, पुणे रेल्वे स्टेशन (Pune Railway Station), स्वारगेट, कात्रज, नाना पेठ येथील तब्बल 300 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी निष्पन्न केला. दरम्यान, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या (Chaturshringi Police Station) हद्दीतील भोसले नगर येथे दोन ठिकाणी घरफोडी झाली होती. तेथील सीसीटीव्ही तपासले असता कल्याणीनगर येथील व भोसले नगर येथील गुन्ह्यातील आरोपी एकच असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करत असताना आरोपी हे तेलंगणा राज्यातील असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेलंगणा येथे जाऊन नरेंद्र नुनसावत याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्याने त्याने हे गुन्हे त्याचे साथीदार सतिश बाबू करी (रा. तेलंगणा) व गुरुनायक केतावत (रा. हैदराबाद, तेलंगणा) यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली.

आरोपी मोठ्या शहरामध्ये जाऊन इंटरनेट वरुन रिच एरिया सर्च करत होते. त्यावरुन प्राप्त झालेल्या माहितीच्या
आधारे परिसरात रेकी करुन रात्रीच्या वेळी घरफोडी करत असल्याचे आरोपीने सांगितले.
आरोपींनी अशाच प्रकारे भोसले नगर येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून पुणे शहरातील येरवडा आणि
चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार
शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borat),
येरवडा विभाग (Yerwada Division) सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील (ACP Sanjay Patil),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव (Senior PI Kanchan Jadhav), पोलीस निरीक्षक गुन्हे जयदिप गायकवाड
(PI Jaydeep Gaikwad) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे (PSI Ankush Dombale),
श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदिप सुर्वे (PSI Pradip Surve), पोलीस अंमलदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे,
किरण घुटे, अमजद शेख, सागर जगदाळे, कैलास डुकरे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे,
दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील
(API Narendra Patil), पोलीस अंमलदार श्रीकांत वाघोले, इरफान मोमीन, ज्ञानेश्वर मुळे प्रदिप खरात यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Leader Sharmila Thackeray | आदित्यची बाजू घेतल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी मानले आभार, पण शर्मिला ठाकरे म्हणाल्या, ”जो भाऊ तुमच्यासोबत…”

आयटी इंजिनिअरला पार्ट टाईमचा पडला मोह; फाईव्ह स्टार रेटिंग देताना बँक खाते झाले रिकामे

खडकीमधील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 71 वी स्थानबध्दतेची कारवाई

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case | Satish Wagh was killed by paying a supari of 5 lakhs; Out of the five accused, 3 accused were detained by the police; Neighbor committed act due to personal dispute (Video)

Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांची हत्या 5 लाखांची सुपारी देऊन; पाच आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; शेजारी राहणार्‍याने वैयक्तिक वादातून केले कृत्य (Video)