Pune Pimpri Chinchwad Crime News | जुन्या भांडणाच्या कारणावरुन मोठा भाऊ, वहिनीच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | जुन्या भांडणाच्या कारणावरुन लहान भावाने मोठा भाऊ व वहिनीच्या डोक्यात दगड घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. त्यात दोघे जबर जखमी झाले असून त्यांच्यावर हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. पत्नी बेशुद्धावस्थेत असून तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत लक्ष्मण किसन गायकवाड (वय ५०, रा. विठ्ठलवाडी, ता. इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात (Indapur Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३३/२४) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा भाऊ महादेव गायकवाड (वय ४०), त्याची पत्नी लता गायकवाड (वय४०, रा. विठ्ठलवाडी, ता. इंदापूर) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मण व त्यांची पत्नी संगीता गायकवाड हे शेतात काम करत होते.
त्यावेळी जुन्या भांडणाचे कारणावरुन त्यांचा भाऊ महादेव व त्याची पत्नी लता गायकवाड यांनी पत्नीला हाताने मारहाण करुन डोक्यात लोखंडी खोरे मारुन जखमी केले. तिचा आवाज ऐकून फिर्यादी तेथे गेल्यावर महादेव याने तू किती केस करतो ते कर अशी धमकी देऊन तेथे पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारुन जबर जखमी केले. पत्नीच्या डोक्यात गंभीर जखम झाल्याने त्या जागीच बेशुद्ध झाल्या. त्यांना तातडीने पुण्यात आणून हडपसरमधील रुग्णालयात दाखल केले. दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. लता गायकवाड या बेशुद्ध अवस्थेत होत्या. पोलिसांनी हॉस्पिटलमधूनच फिर्याद घेतली असून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC – Swachh Bharat Mission | स्वच्छ भारत मिशनच्या नावाखाली महापालिकेची तिजोरी ‘स्वच्छ’? 600 टन टिपिंग फी दिली जात असताना प्रशासन 875 रुपये टिपिंग फीचा प्रस्ताव मान्य करणार !

तीन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य, नराधमास अटक; कोंढवा परिसरातील प्रकार

Maharashtra Police Suicide News | गळफास घेऊन पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

पुणे : अश्लील हावभाव करुन महिलेचा विनयभंग, पतीला जीवे मारण्याची धमकी