Pune PMC – Swachh Bharat Mission | स्वच्छ भारत मिशनच्या नावाखाली महापालिकेची तिजोरी ‘स्वच्छ’? 600 टन टिपिंग फी दिली जात असताना प्रशासन 875 रुपये टिपिंग फीचा प्रस्ताव मान्य करणार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune PMC – Swachh Bharat Mission | पुणे शहराला स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत ‘सर्वोत्तम’ करण्याच्या घोषणा केल्या जात असताना प्रशासनाकडून पालिकेची तिजोरीच ‘स्वच्छ’ करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सध्याच्या प्रक्रिया प्रकल्पांना ६०० रुपये प्रतिटन टिपिंग फी दीली जात असताना केवळ सिमेंट कंपनीला इंधन म्हणून कचरा पुरविण्यासाठी तब्बल ८७५ रुपये प्रतिटन टिपिंग फी द्यावी लागणार? असा प्रश्‍न नुकतेच यासंदर्भातील निविदा उघडल्यानंतर निर्माण झाला आहे. (Pune PMC – Swachh Bharat Mission )

महापालिकेच्यावतीने शहरात राहाणार्‍या अतिरिक्त १५० कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. प्रामुख्याने या कचर्‍यावर प्रक्रिया करण्याऐवजी तो सिमेंट कंपन्या व अन्य उद्योगांना इंधन म्हणून पुरविण्यासाठीची ही निविदा होती. या निविदेमध्ये आदर्श कंपनीची ८७५ रुपये प्रतिटन टिपिंग फीची निविदा सर्वात कमी दराने आली आहे. त्यामुळे लवकरच यासंदर्भातील प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात येणार आहे.

वास्तविकता शहरातील बहुतांश कचर्‍यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. यामध्ये ओल्या कचर्‍यासोबतच मिक्स कचर्‍यावर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांना सरासरी ६०० रुपये प्रतिटन दराप्रमाणे टीपिंग फी देण्यात येते. यासोबतच रामटेकडी येथे कचर्‍यापासून हायड्रोजन निर्मितीचा ७५० टन क्षमतेचा प्रकल्प तसेच अन्य काही ठिकाणी ५० ते १०० टन क्षमतेचे प्रक्रिया प्रकल्पांना देखिल मान्यता देण्यात आलेली आहे. हे प्रकल्प सुरू झाल्यास सर्व प्रकल्पांना कचरा कोठून पुरवायचा असा प्रश्‍न निर्माण होणार आहे. असे असताना ८७५ रुपये टीपिंग फी देउन कचरा बाहेर पाठविण्याचा आतबट्टयाचा व्यवहार कशासाठी आणि कोणासाठी? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

यापुर्वी देखिल शहराबाहेर कचरा वाहून नेण्याच्या नावाखाली तो लगतच्या गावामध्ये साठविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
त्यामुळे खरोखरच अधिकचे पैसे देउन सिमेंट कंपन्या किंवा अन्य उद्योगांमध्ये इंधनासाठी हा कचरा जाणार?
किंवा लगतच्या गावांमध्ये तो साठविला जाणार? असे अनेक प्रश्‍न यातून निर्माण होत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तीन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य, नराधमास अटक; कोंढवा परिसरातील प्रकार

Maharashtra Police Suicide News | गळफास घेऊन पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

पुणे : अश्लील हावभाव करुन महिलेचा विनयभंग, पतीला जीवे मारण्याची धमकी