Pune Pimpri Chinchwad Crime News | परभणी येथून हिंजवडीत येऊन करत होता वाहनांची चोरी, 350 सीसीटीव्ही तपासून हिंजवडी पोलिसांनी केली अटक; 18 दुचाकी जप्त (व्हिडीओ)

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | परभणी येथून हिंजवडी येथील पांडवनगर परिसरात राहून दुचाकी चोरी (Vehicle Theft) करणाऱ्या आरोपीच्या हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police) मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून 5 लाख 40 हजार रुपये किमतीच्या 18 दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपीने त्याच्या साथीदाराच्या मदतीने शेतकऱ्यांना कमी किमतीत दुचाकी विकल्याचे तपासात समोर आले आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

रवि परमेश्वर धांडगे (वय-20), विकास उद्धव धांडगे (दोघे रा. पाथरगव्हाण, ता. पाथरी, जि. परभणी-Parbhani) अशी अटक (Arrest) केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, 19 जुलै रोजी एका कंपनी समोरुन भर दिवसा दुचाकी चोरी झाली होती. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना हिंजवडी व वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकच व्यक्ती वारंवार चोरी करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरुन स्पष्ट झाले. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

तपास पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी हिंजवडी, पुणे ते सुपा पर्यंत 350 सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासले. दरम्यान पोलीस शिपाई पालवे यांना माहिती मिळाली की सीसीटीव्ही फुटेज मधील व्यक्ती हा परभणी जिल्ह्यातील पाथरगव्हाण येथील असून तो अधुन मधून हिंजवडी येथील पांडवनगर परिसरात राहण्यास येऊन दुचाकी चोरून गावी जात असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी रवि धांडगे याला तब्यात घेतले.

आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने चोरी केलेली दुचाकी विकास धांडगे याला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी एका शेतात सापळा रचून विकास धांडगे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान रवी धांडगे याने अनेक दुचाकी चोरी केल्या असून चोरलेल्या दुचाकी उद्धव धांडगे हा शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन गाडीचे कागदपत्रे दोन दिवसात आणून देतो असे खोटे सांगून विक्री करीत होता. चौकशीत त्याने 15 जणांना दुचाकी विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रवि धांडगे याची पोलीस कोठडीमध्ये केलेल्या चौकशीत त्याने तीन दुचाकी नातेवाईकांच्या घरी विक्रीसाठी ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

चोरट्यांनी हिंजवडी, वाकड (Wakad Police Station), सहकारनगर (Sahkarnagar Police Station), विश्रामबाग (Vishram Bagh Police Station), सेलु (Selu Police Station), मानवत (Manawat Police Station), नानलपेठ (Nanalpet Police Station), माजलगाव पोलीस ठाण्याच्या (Majalgaon Police Station) हद्दीत वाहन चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून 11 गुन्हे उघडकीस आले असून 7 दुचाकींचा तपास सुरु आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपींकडून 5 लाख 40 हजार रुपये किमतीच्या 18 दुचाकी जप्त केल्या असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ही कामगीरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinoy Kumar Choubey),
पोलीस सह आयुक्त संजय शिंदे (Addl CP Sanjay Shinde),
अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (Addl CP Vasant Pardeshi),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 काकासाहेब डोळे (DCP Kakasaheb Dole),
सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे (ACP Dr. Vishal Hire),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर (Senior PI Vivek Muglikar),
पोलीस निरीक्षक सुनिल दहिफळे (PI Sunil Dahifale),
सोन्याबापु देशमुख (PI Sonyabapu Deshmukh)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे (API Sagar Kate),
राम गोमारे (API Ram Gomare), पोलीस अंमलदार बंडू मारणे, बापु धुमाळ,
बाळकृष्ण शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे. रितेश कोळी, अरुण नरळे,
श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, नरेश बलसाने, अमर राणे, कारभारी पालवे,
ओमप्रकाश कांबळे, दत्तात्रय शिंदे, सागर पंडीत यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap | पुण्यातील पोलिस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात