Pune Pimpri Chinchwad Crime News | मावळमधील उद्योगपती व तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्यावर भरदिवसा गोळीबार, कोयत्याने वार करून खून

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | माळव तालुक्यातील उद्योगपती व तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे (Janseva Vikas Samiti) संस्थापक किशोर आवारे (kishor aware) यांच्यावर शुक्रवारी (दि.12) भरदिवसा जिवघेणा हल्ला (Attack To Kill) करण्यात आला. किशोर आवारे यांच्यावर यांच्यावर गोळीबार (Firing In Pune) आणि कोयत्याने वार करण्यात आले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आवारे यांना तातडीने सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू (Murder In Pimpri) झाला. ही घटना (Pune Pimpri Chinchwad Crime News) शुक्रवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास तळेगाव नगरपरिषदेच्या (Talegaon Municipal Council) कार्यालयासमोर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्यधिकारी यांची भेट घेऊन खाली आले. त्यावेळी चार हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. दोघांनी गोळीबार केला तर इतर दोघांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही हल्लेखोर काहीवेळ त्याच ठिकाणी थांबले होते. जखमी अवस्थेत आवारे यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून तळेगाव शहरात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांची समाजाशी
नाळ जोडली होती. आवारे सहा वर्षापूर्वी झालेल्या तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत जनसेवा विकास समितीचे
नगरसेवक म्हणून निवडून आले होते. किशोर आवारे यांच्या प्राणघात हल्ला झाल्याची घटना समजताच
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील (Talegaon Dabhade Police Station) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी
घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे तळेगाव शहरात तणावाचे वातावरण आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे. किशोर आवारेंचा गोळीबार करून खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

Web Title :-   Pune Pimpri Chinchwad Crime News | Kishore Aware, an industrialist in Maval and the founder of Jansewa Vikas Samiti in Talegaon Dabhade, was shot in broad daylight, stabbed to death with a Koyta

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Accident News | पुणे क्राईम अ‍ॅक्सीडेंट न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन : कात्रज – कोंढवा रस्त्यावर भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यु

Uddhav Thackeray On Rahul Narvekar | ‘जर अध्यक्षांनी काही उलट-सुलट केलं तर…’, उद्धव ठाकरेंचा विधानसभा अध्यक्षांना इशारा (व्हिडिओ)