Pune Pimpri Chinchwad Crime News | महावितरणच्या अभियंता, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की एकावर गुन्हा, लोणी काळभोर परिसरातील घटना

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | वीजबिलांच्या थकबाकीमुळे घरगुती वीज पुरवठा (Electricity Supply) खंडित केल्यानंतर शेजारून परस्पर अनधिकृत वीज वापरल्याप्रकरणी कारवाई करीत असताना महावितरणचे (MSEDCL) अभियंता व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणला. या प्रकरणी एकाविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता (Sub-Divisional Deputy Executive Engineer) धम्मपाल हौसाजी पंडीत (वय-50 रा. सातवनगर, हडपसर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन गणेश दौंडकर (वय-47 रा. थेऊर फाटा, कुंजीरवाडी, पुणे) याच्यावर आयपीसी 353, 323 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.26) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कुंजीरवाडी येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

ADV

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरणच्या मुळशी विभागातील उरूळीकांचन उपविभागाचे उपकार्यकारी
अभियंता धम्मपाल पंडित हे सहकारी जनमित्र सुनील शिंदे, अंचल बागडे, अश्विनी गोरे, किरण झेंडे यांच्यासह
मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास थेऊर फाटा, कुंजिरवाडी येथे थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करीत होते.

आंबेकरवस्ती येथील लता मोहन दौंडकर यांच्या नावे असलेल्या घरगुती वीजबिलाची ९ हजार १५० रुपयांची थकबाकी होती
व वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
मात्र वीजजोडणीची तपासणी केली असता या ग्राहकाकडे शेजारच्या वीजग्राहकाकडून अनधिकृत वीजपुरवठा
घेतल्याचे आढळून आले. या वीजचोरीबाबत स्थळपाहणी अहवाल तयार करण्यात आला.
यासंदर्भात संबंधित वीजग्राहकांना माहिती देत असताना गणेश दौंडकर याने तेथे येऊन स्थळपाहणीचा अहवाल
फाडून टाकला. तसेच माझ्या दारात येण्याचा काय संबंध असे म्हणत उपकार्यकारी अभियंता पंडित
व सहकाऱ्यांना धक्काबुक्की केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोडके (API Ghodke) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SWaCH – Pune Municipal Corporation (PMC) | कचरा गोळा करणार्‍या ‘स्वच्छ’ संस्थेच्या लढ्याला यश; पुणे महापालिका प्रशासनाची पाच वर्षांच्या कराराला मान्यता

Pune Pimpri Chinchwad Crime News | हिंजवडीतील अ‍ॅकॉर्ड अ‍ॅटॉकॅम्प कंपनीत गॅस भट्टीचा स्फोट, 20 कामगार गंभीर जखमी; मालक, प्रशासन यांच्यावर FIR

Jitendra Awhad On Ajit Pawar | ”शरद पवार आणि काकांच्या सावलीत वाढलेले अजित पवार यांच्यात बरंच अंतर”, आव्हाडांनी दादांना सुनावले