Pune Pimpri Chinchwad Crime News | हिंजवडीतील अ‍ॅकॉर्ड अ‍ॅटॉकॅम्प कंपनीत गॅस भट्टीचा स्फोट, 20 कामगार गंभीर जखमी; मालक, प्रशासन यांच्यावर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | चारचाकी वाहनांचे अ‍ॅटोमोबाईल्स पार्ट्स (Automobiles Parts) बनवणाऱ्या हिंजवडी फेज-1 येथील अ‍ॅकॉर्ड अ‍ॅटोकॅम्प प्रा. लि. (Accord Autocamp Pvt. Ltd.) कंपनीत गॅस भट्टी गरम होऊन स्फोट (Gas Furnace Explosion) झाला. यामध्ये 20 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी कंपनीचे मालक, प्रशासन, इतर मेंटनन्स चे काम पाहणाऱ्यांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि.26) सकाळी अकराच्या सुमारास घडली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत सगार लक्ष्मण सोलसे (वय-35 हेल्पर, रा. शेळकेवाडी, घोटावडे, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अ‍ॅकॉर्ड अ‍ॅटोकॅम्प प्रा. लि. कंपनीचे मालक प्रशासन, इतर मेंटनन्सचे काम पाहणाऱ्या व्यक्तींवर आयपीसी 285, 287, 336, 337, 338, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेज 1 येथील अ‍ॅकॉर्ड अ‍ॅटोकॅम्प कंपनीत फिर्यादी व इतर 19 कामगार हे
चारचाकी वाहनांच्या अ‍ॅटोमोबाईल्स पार्टसला गॅस भट्टीच्या ओव्हन मशिनमध्ये कोटींग करत होते.
त्यावेळी गॅस भट्टी गरम होवून त्यामध्ये स्फोट झाला. त्यामुळे गॅस भट्टीमधील पावडर कोटींग करीता ठेवलेले पार्टस
व आगीच्या ज्वाळा कामगारांच्या शरीरावर उडून फिर्यादी यांच्यासह 19 कामगार गंभीर जखमी झाले.

आरोपींनी या ठिकाणी स्फोटक गॅस भट्टीची नियमीत देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे होते. मात्र, कंपनीचे मालक, प्रशासन
व इतर मेंटनन्स चे काम पाहणाऱ्यांनी जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे गॅस भट्टीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली.
आरोपींनी फिर्यादी व इतर 19 कामगारांचा जीव धोक्यात येईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक सोन्याबापु देशमुख (PI Sonyabapu Deshmukh) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Intelligence Bureau Bharti | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, आयबीमध्ये मोठी भरती, लवकर करा अर्ज, प्रक्रिया सुरू

Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांनी पोलीस प्रशासनाची बाजू उचलून धरत पालकांना दिला दोष, ”१४ व्या वर्षी हातात मोबाईल…”

Post Viral On Social Media | लवकरच पुलवामा सारखा हल्ला होईल ! सोशल मीडियावर विद्यार्थ्याची पोस्ट; झारखंडमधील विद्यार्थी अटकेत, संरक्षण मंत्री काश्मीर दौर्‍यावर

NCP MP Amol Kolhe | अमोल कोल्हेंचा शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू, राज्य सरकारवर ओढला आसूड, ”फक्त दिल्लीसमोर माना खाली घालून…”

Solapur Karmala Accident News | शिर्डीला दर्शनासाठी निघालेल्या चार भाविकांचा कार अपघातात मृत्यू; आठ महिन्यांची मुलगी बचावली

Pune Police Inspector Transfers | पुण्यातील 10 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, कोंढवा, अलंकार पोलिस स्टेशन आणि वाहतूक शाखेत नियुक्त्या