Pune Pimpri Chinchwad Crime News | चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करुन खून; वारजे पोलिसांकडून पतीला 5 तासात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करुन खून (Murder In Pune) केल्याची घटना मंगळवारी घडली. ही घटना कर्वेनगर येथील संभा नगर हिंगणे होम कॉलनी (Hingane Home Colony) येथे सकाळी साडे सहा ते पावणे सातच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी (Pune Police) आरोपी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पुजा लखन कांबळे (वय-27 रा. हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर) असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. तर लखन बालाजी कांबळे (वय-30) याच्यावर आयपीसी 302 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत सुरेखा शरद मोरे (वय-40 रा. हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर, पुणे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे दाम्पत्या मुळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील असून कामाच्या निमित्ताने पुणे
शहरात आले होते. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. मात्र, आरोपी लखन याला काहीच काम नव्हते.
तो पत्नी पुजाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून त्यांच्यामध्ये सतत वाद होत होते.
मंगळवारी सकाळी याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाले. संतापलेल्या लखन याने फरशी कुऱ्हाडीने पुजाच्या गळ्यावर
वार केला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने पुजाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पळून गेला.

आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली होती. तपास पथकाचे पोलीस अधिकारी यांना माहिती मिळाली की, आरोपी हा त्याच्या मुळ गावी उस्मानाबद येथे सोलापुर हायवेने मोपेड दुचाकीवरुन जात आहे. पथक खासगी वाहनाने आरोपीच्या मागे गेले. दरम्यान आरोपी यवत येथुन पुन्हा पुण्याच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक यवतच्या दिशेने जात असताना आरोपी हायवेवरुन विरुद्ध दिशेने पुण्याकडे येत असल्याचे दिसून आला. पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला. लोणी काळभोर टोलनाक्यावर पथकाने गाडी आडवी मारुन आरोपीला थांबवले असता आरोपी गाडी सोडून पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन आरोपीला अटक केली.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Pravin Kumar Patil),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 संभाजी कदम (DCP Sambhaji Kadam), सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे
(ACP Bhimrao Tele) , वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर (Sr PI Sunil Jaitapurkar),
पोलीस निरीक्षक गुन्हे अजय कुलकर्णी (PI Ajay Kulkarni) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे
(PSI Narendra Mundhe), रामेश्वर पार्वे (PSI Rameshwar Parve), पोलीस अंमलदार प्रदीप शेलार, हनुमंत मासाळ,
बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, विक्रम खिलारी, अमोल सुतकर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

जाहिरातींच्या हक्कांच्या बदल्यात शौचालयांची देखभाल दुरूस्ती; प्रशासनाने घनकचरा विभागाचा प्रस्ताव रद्द केला

बेकायदा बांधकामे आढळल्यास तातडीने कारवाईचे आदेश

Pune PMC News | पुणे महापालिकेचा कारभार होतोय ‘डिजिटल’ ! 60 पैकी 16 विभागात ई ऑफिस प्रणाली कार्यन्वीत – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

Pune News | कात्रज दूध डेअरी लगतच्या खेळाच्या मैदानावरील आरक्षण उठवून दूध डेअरी व प्रक्रियाचे आरक्षण टाकणार

‘मतांचे’ राजकारण आणि अर्थकारणामुळे पुणे शहर होतेय वेगाने बकाल