Pune News | ‘मतांचे’ राजकारण आणि अर्थकारणामुळे पुणे शहर होतेय वेगाने बकाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | लोकसंख्या वाढीसोबत बेकायदा बांधकामे (Illegal Constructions) मोठया शहरांची डोकेदुखी ठरत आहेत. या बांधकामांना प्रतिबंध घालण्यासाठी तयार होणारे कायदे आणि त्याची अंमलबजावणी करणारी अपुरी यंत्रणा यामुळे गेल्या अनेक दशकांत कायदे मोडण्याचीच परंपरा निरंतर सुरू आहे. ‘मतांच्या’ राजकारण आणि प्रशासकीय यंत्रणेतील ‘अर्थकारण’ यामुळे ‘कायदे’ धाब्यावर बसवण्याचा वृत्तीमुळे पुण्यासारखी मोठी शहरे वेगाने बकाल होत आहेत. (Pune News)

मागील दोन दशकात पुण्याची लोकसंख्या 25 लाखांवरून 60 लाखांवर पोहोचली आहे. उद्योग, रोजगार आणि शिक्षणासाठी लोंढेच्या लोंढे शहरावर आदळत आहेत. मागील काही दशकात दुष्काळ व रोजगारासाठी येथे स्थलांतरित झालेल्यांनी खासगी, शासकीय जागाच न्हवे पाणथळ जागा, डोंगरावर बेकायदा वसाहती बांधल्या आहेत. या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी एसआरए, बीएसयूपी सारख्या योजना राबविल्या गेल्या आहेत..ही प्रक्रिया निरंतर सुरू आहे. महापालिका हद्दीलगतच्या गावांत देखील बांधकामाचे स्तोम माजत जाऊन ही गावे महापालिकेत समाविष्ट केली जात आहेत. त्यामुळे महापालिकेचा भौगोलिक विस्तार झपाट्याने झाला आहे. या विस्तारामध्ये सभोवतालचे कधीकाळी हिरवेगार डोंगर सिमेंट च्या जंगलात रूपांतरित झाले आहेत. याची डोकेदुखी जेवढी महापालिकेला आहे तेवढीच शासनाला आहे.

डोंगर माथा डोंगर उतार, बिडीपी क्षेत्रातील बेकायदा बांधकामे आणि याबाबतचा निर्णय शासन दरबारी प्रलंबित आहे.
गुंठेवारीतील घरांचे नियमितीकरण लालफिती मुळे कठीण होऊन बसले आहे, बेकायदा बांधकामाना लगाम बसावा यासाठीच्या नियमांत शासनाने शिथिलता आणली आहे. यातून उरलेली प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेत अडकली आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी आर्थिक आणि मनुष्यबळाची कमतरता यामुळे नागरीसुविधांचा वानवा, याचा फटका शहराला बसत आहे. (Pune News)

मोठया शहरांचे व्यवस्थापन करण्यात सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेतृत्व अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत आहेत.
यामागे जेवढा भाग राजकारणाचा आहे तेवढेच मोठे अर्थकारण आहे.
यामध्ये घराचे स्वप्न पाहणारा सर्वसामान्य नागरिक भरडत आहे.
तर यालाच सुवर्णसंधी मानून काही राजकारणी आणि शासन आणि प्रशासनातील अधिकारी गबर होत आहेत.
एकमेकांकडे बोट दाखवून हे दोन्ही घटक गेली काही दशके शहराचे वाटोळे करत आहेत.
हे दोन्ही घटक निरपेक्ष भावनेने एकत्र आल्याशिवाय शहराचे सुनियोजित व्यवस्थापन करणे केवळ अशक्य आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | पुणे महापालिकेचा कारभार होतोय ‘डिजिटल’ ! 60 पैकी 16 विभागात ई ऑफिस प्रणाली कार्यन्वीत – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

Pune News | कात्रज दूध डेअरी लगतच्या खेळाच्या मैदानावरील आरक्षण उठवून दूध डेअरी व प्रक्रियाचे आरक्षण टाकणार