Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : चाकूने वार करुन जखमी केलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन एका व्यक्तीला चाकूने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. हा प्रकार खेड तालुक्यातील नाणेकरवाडी येथील गवते वस्ती येथे 28 जानेवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडला होता. जखमी झालेल्या व्यक्तीवर उपचार सुरु असताना बुधवारी (दि.31 जानेवारी) मृत्यू झाला असून आरोपीवर दाखल गुन्ह्यात खुनाच्या (Murder Case) कलमाचा अंतर्भाव करुन अटक करण्यात आली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

रमेश सुरेश भोसले (वय-55 रा. बालाजी नगर, पॉवर हाऊस, लांडेवाडी भोसरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) फिर्याद दिली होती. यावरुन कृष्णा गणेश भोसले (रा.लांडेवाडी, भोसरी) याच्यावर आयपीसी 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये आयपीसी 302 च्या कलमाचा अंतर्भाव करुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांचा मुलगा आकाश याला मारहाण केली होती.
फिर्यादी यांनी याचा जाब आरोपीला विचारला.
याचा राग आल्याने आरोपी कृष्णा भोसले यांने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने फिर्यादी यांच्या पोटात डाव्या बाजूला भोसकले.
यामध्ये रमेश भोसले हे गंभीर जखमी झाले होते. सुरेश भोसले यांच्यावर चाकण येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. चाकण पोलिसांनी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरखंडे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Budget 2024 | कर रचना जैसे थे, प्राप्तिकर भरणाऱ्यांना दिलासा नाही, निर्मला सीतारमण यांनी मांडले महत्वाचे मुद्दे

Pune Police MCOCA & MPDA Action | पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 13 महिन्यात 117 ‘मोक्का’ तर 103 MPDA कारवाया

Budget 2024 | अर्थसंकल्पावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया, ‘या’ दोन महत्त्वाच्या घोषणांचा केला उल्लेख!