Budget 2024 | कर रचना जैसे थे, प्राप्तिकर भरणाऱ्यांना दिलासा नाही, निर्मला सीतारमण यांनी मांडले महत्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत अर्थसंकल्प (Budget 2024 ) सादर केला. बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी कर रचनेत कोणताही बदल केला नसल्याचे सांगितले. सीतारमण म्हणाल्या, सध्या ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जात नसून प्राप्तिकर भरण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. दरम्यान, बजेटमध्ये कर रचनेत बदल न केल्याने करदात्यांना यावेळी कोणताही दिलासा मिळालेला नाही.

सितारामन यांनी म्हटले की, कर परतावा देखील त्वरित जारी केला जात आहे. देशाचे जीएसटी संकलन दुपटीने वाढले आहे. जीएसटीने अप्रत्यक्ष कर प्रणाली बदलली आहे. वित्तीय तूट ५.१ टक्के राहण्याचा अंदाज आहे. खर्च ४४.९० कोटी रुपये असून, अंदाजे महसूल ३० लाख कोटी रुपये आहे.

अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे

 • सार्वजनिक वाहतुकीसाठी ई-वाहने उपलब्ध करून दिली जाणार.
 • रेल्वे-सागरी मार्ग जोडण्यावरही भर दिला जाणार.
 • पर्यटन केंद्रांच्या विकासाला गती मिळणार.
 • टियर २ आणि टियर ३ शहरे हवाई मार्गाने जोडली जाणार.
 • लक्षद्वीपमध्ये नवीन प्रकल्प सुरू होतील. यामुळे पर्यटन क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला चालना मिळेल.
 • जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प, त्यात विकसित भारताचा रोडमॅप मांडण्यात येणार.
 • पायाभूत सुविधांवर ११ टक्के अधिक खर्च केला जाणार.
 • लोकसंख्या वाढीबाबत समिती स्थापन.
 • प्रत्येकाला कायमस्वरूपी घरे दिली जातील.
 • पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचा विस्तार केला जाणार.
 • तीन रेल्वे कॉरिडॉर सुरू केले जातील. पॅसेंजर गाड्यांचे कामकाज सुधारले जाणार.
 • पंतप्रधान गती शक्ती योजनेंतर्गत कामांना गती देणार.
 • मालवाहतूक प्रकल्प विकसित केला जाणार.
 • ४० हजार सामान्य रेल्वे डबे वंदे भारतमध्ये जोडले जाणार.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : बँकेकडे जमीन गहाण ठेवून 64 लाखांची फसवणूक, अमित एंटरप्रायजेस दि इंडीयनच्या संचालकांसह बँक अधिकाऱ्यांवर FIR

मामाकडून 9 वर्षीय भाच्यावर लैंगिक अत्याचार, समुपदेशनातून प्रकार उघडकीस

पुणे : अल्पवयीन मुलीवर चुलत्याकडून लैंगिक अत्याचार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल