Budget 2024 | अर्थसंकल्पावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया, ‘या’ दोन महत्त्वाच्या घोषणांचा केला उल्लेख!

नवी दिल्ली : Budget 2024 | अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2024) आज लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उत्साहवर्धक प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधानांनी अर्थसंकल्पातील संशोधनासाठीच्या निधीची तरतुद आणि स्टार्टअप्स संबंधी केलेल्या दोन घोषणांचा आवर्जून उल्लेख केला आहे.

‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, अर्थसंकल्पात दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. संशोधनावर १ लाख कोटींचा निधी तयार करण्याची घोषणा केली आहे. स्टार्टअप्सला मिळणाऱ्या करसूटीचा विस्तार करण्याचीही घोषणा केली आहे. वित्तीय तुटीला नियंत्रणात ठेवतानाच भांडवली खर्चाला ११ लाख ११ हजार १११ कोटींपर्यंतच्या ऐतिहासिक उंचीवर नेऊन ठेवण्यात आले आहे.

पंतप्रधानांनी म्हटले आहे की, अर्थतज्ज्ञांच्या भाषेत सांगायचे तर हा एकप्रकारे ‘स्वीट स्पॉट’ आहे. यामुळे भारतात २१व्या शतकासाठी आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीबरोबरच युवकांसाठी अगणित रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.

बजेट संबंधीच्या आणखी एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे की, आम्ही २ कोटी महिलांना लखपती दीदी
बनवण्याचे ध्येय ठरवले होते. आता हे ध्येय ३ कोटींपर्यंत वाढवले आहे. आयुष्मान भारत योजनेने गरिबांना मोठी मदत केली.
आता अंगणवाडी सेविका व आशा सेविकांना याची मदत होईल. गरीब वर्गाची उत्पन्नाची साधने वाढवण्यावर जोर देण्यात आला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रेल्वेसंदर्भात केलेल्या घोषणांचा उल्लेख करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले
आहे की, अर्थसंकल्पात वंदे भारत दर्जाच्या ४० हजार आधुनिक कोचेसची निर्मिती करून ते सामान्य प्रवासी रेल्वेमध्ये
जोडण्याची घोषणा केली आहे. यामुळे कोट्यवधी प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल.
आम्ही एक मोठे ध्येय ठरवतो, ते पूर्ण करतो आणि त्यानंतर त्याहून मोठे ध्येय ठरवतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : बँकेकडे जमीन गहाण ठेवून 64 लाखांची फसवणूक, अमित एंटरप्रायजेस दि इंडीयनच्या संचालकांसह बँक अधिकाऱ्यांवर FIR

मामाकडून 9 वर्षीय भाच्यावर लैंगिक अत्याचार, समुपदेशनातून प्रकार उघडकीस

पुणे : अल्पवयीन मुलीवर चुलत्याकडून लैंगिक अत्याचार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल