MNS Chief Raj Thackeray | मराठा आरक्षणावर राज ठाकरेंचा सवाल, ”आनंद व्यक्त केला, मग परत उपोषणाची वेळ का आली?”

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – MNS Chief Raj Thackeray | नवी मुंबईत मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलकांची (Maratha Reservation) भेट घेतली आणि मराठा मोर्चेकरी विजयोत्सव साजरा करू लागले. पण विजय काय मिळाला, हे तर लोकांना कळले पाहीजे. जे सामान्य मराठा बांधव, भगिनी मुंबईत आले होते, त्यांना तरी निर्णय काय झाला, हे कळलं का? जर तेव्हा आनंद व्यक्त केला होता, तर आता परत उपोषणाची वेळ का आली?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी उपस्थित केला आहे. ते आज नाशिक येथे पत्रकार परिषद बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, मी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली, तेव्हा आंदोलकांसमोरच माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती. जरांगे पाटील यांची मागणी झटक्यात पूर्ण होणार नाही. हा तांत्रिक आणि कायद्याचा मुद्दा आहे.

राज ठाकरे पुढे म्हणाले, आरक्षणाचा अशाप्रकारचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही आणि केंद्र सरकारला यावर
निर्णय घ्यायचा असेल तर सर्व राज्यांची मते जाणून घ्यावी लागतील. कारण प्रत्येक राज्यात ही परिस्थिती आहे.
त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावे लागेल. विशेष अधिवेशन बोलवावे लागेल.

राज ठाकरे म्हणाले, मी एखादी गोष्ट बोलतो, ती सुरुवातीला कडवट वाटते. पण तिच गोष्ट सत्य असते.
मागे एकदा मराठा समाजाला तापवले, ते सर्व मुंबईत आले. आता दुसऱ्यांदा मोर्चा काढला.
पण आपण वस्तूस्थिती पाहणार आहोत की नाही? कुणाच्या तरी राजकीय अजेंड्यासाठी आपल्याला मोर्चासाठी नेले
जात आहे, याचा विचार केला पाहीजे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : मानसिक त्रासातून गरोदर महिलेची आत्महत्या, पतीसह तिघांवर FIR

पुणे : बिल्डरची पावणे दोन कोटींची फसवणूक, कुणाल हौसिंगच्या भागिदारांवर FIR

निरंकारी सदगुरु माताजीं चे ७ फेब्रुवारी ला पुणे येथे आगमन; संत निरंकारी भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण

जेवण बनवले नाही म्हणून पत्नीवर चाकूने वार, हडपसर परिसरातील घटना

पोलीस अधिकाऱ्याला झाडाची कुंडी फेकून मारत आत्महत्या करण्याची धमकी, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील प्रकार

पुण्यातील नऱ्हे परिसरातील फ्लॅटमध्ये वडील, मुलगा मृतावस्थेत आढळले, परिसरात खळबळ

तळेगाव दाभाडे : सुट्या पैशांवरून वाहकासोबत हुज्जत घालणाऱ्या महिलेसह तिघांवर FIR

Pune Police News | पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची ‘या’ गोष्टींना असणार प्राथमिकता (Video)