MNS Chief Raj Thackeray | २०२४ मध्ये पंतप्रधानपदी कोण असावे? राज ठाकरेंनी दिले खास शैलीत उत्तर, ”यासाठी चाचपणी…”

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन –मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) संघटनात्मक दौऱ्यासाठी नाशिकमध्ये असून त्यांनी आज येथे पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी पत्रकारांनी त्यांना २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी नरेंद्र मोदींना दिलेल्या समर्थनावरून प्रश्न विचारला की, देशाचा आगामी पंतप्रधान (PM Candidate) कोण असावा? यावर राज ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले.(MNS Chief Raj Thackeray)

राज ठाकरे म्हणाले, त्यांच्यासारखा व्यक्ती पंतप्रधानपदावर असावा, अशी फक्त इच्छा मी त्यावेळी व्यक्त केली होती. यावेळी तसा काही विचार केलेला नाही. पंतप्रधानपदी कोण असावा? याची चाचपणी सुरू आहे. माझी चाचपणी झाली की सांगेन.

ते पुढे म्हणाले, मागच्या काही महिन्यांपासून मनसेचे पदाधिकारी अनेक मतदारसंघाचा आढावा घेत आहेत.
कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवावी आणि कुठे लढवू नये, याचा आढावा घेतला जात आहे. ज्यांच्या हातात केंद्र आणि राज्याची सत्ता आहे, तेही अशाप्रकारची चाचपणी करतात. मग आम्ही केली तर काय हरकत आहे.

जागावाटपावरून महाविकास आघाडीत सुरू असलेल्या वादावरून ठाकरे म्हणाले, त्यांच्या आघाडीचे काहीही भवितव्य नाही.
नितीश कुमार यांच्याच आघाडीत होते. त्याचे काय झाले? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
यावेळी त्यांनी त्यांच्या एका व्यंगचित्राचा सुद्धा उल्लेख केला. ज्यामध्ये इंडिया शब्दातील ‘आय’ आणि ‘ए’ काढला होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : मानसिक त्रासातून गरोदर महिलेची आत्महत्या, पतीसह तिघांवर FIR

पुणे : बिल्डरची पावणे दोन कोटींची फसवणूक, कुणाल हौसिंगच्या भागिदारांवर FIR

निरंकारी सदगुरु माताजीं चे ७ फेब्रुवारी ला पुणे येथे आगमन; संत निरंकारी भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण

जेवण बनवले नाही म्हणून पत्नीवर चाकूने वार, हडपसर परिसरातील घटना

पोलीस अधिकाऱ्याला झाडाची कुंडी फेकून मारत आत्महत्या करण्याची धमकी, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील प्रकार

पुण्यातील नऱ्हे परिसरातील फ्लॅटमध्ये वडील, मुलगा मृतावस्थेत आढळले, परिसरात खळबळ

तळेगाव दाभाडे : सुट्या पैशांवरून वाहकासोबत हुज्जत घालणाऱ्या महिलेसह तिघांवर FIR

Pune Police News | पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची ‘या’ गोष्टींना असणार प्राथमिकता (Video)