Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : जुन्या वादातून अंगावर गाडी घालून नेले फरफटत, एकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – जुन्या वदाच्या रागातून अंगावर गाडी घालून तरुणाला फरफटत नेत जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. हा प्रकार गुरुवारी (दि.18) रात्री आठच्या सुमारास पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील (Old Pune-Mumbai highway) मयुर हॉटेलच्या पार्किंगमध्ये घडला आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत महेश दिलीप लोहार (वय-29 रा. दारुंब्रे, ता. मावळ) याने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. तर विशाल बाळासाहेब मोकाशी (वय-30 रा. सांगवडे ता. मावळ) याच्यावर आयपीसी 307, 326, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. यामध्ये फिर्यादी यांचा मित्र मंगेश सावंत हा देखील जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश लोहार आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांचे पूर्वी भांडण झाले होते. याचा राग आरोपीच्या मनात होता. गुरुवारी रात्री महेश हा त्याचा मित्र मंगेश याच्यासोबत हॉटेल मयुरच्या पार्कींगमध्ये थांबले होते. त्यावेळी आरोपी विशाल मोकाशी याने पूर्ववैमनस्यातून महेश याच्या अंगावर गाडी (एमएच 14 ई एच 9714) घातली. तसेच महेश याला फरफटत नेत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महेशचा मित्र मंगेश हा देखील गंभीर जखमी झाला आहे. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक क्षिरसागर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | जीएसटीची रक्कम न भरता पावणे तीन कोटींची फसवणूक, एरंडवणे परिसरातील प्रकार

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : नरबळी द्यावा लागेल, अन्यथा मुलगा व पतीचा मृत्यू होऊन घराचा नायनाट होईल, 35 लाख उकळणाऱ्या मांत्रिकासह पाच जणांवर FIR