Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : कर्ज थकल्याचा बहाणा करुन महिलेची बदनामी, फोटो मॉर्फ करुन व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | कर्जाची परतफेड करत नसल्याचे नातेवाईकांना सांगून महिलेची बदनामी केली. तसेच पाच लाख रुपये दिले नाहीतर फोटो मॉर्फ (Photo Morphing) करुन बदनामी करण्याची धमकी दिली. हा प्रकार 6 मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आळंदी (Alandi) गावात घडला आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) खंडणीचा (Extortion Case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी महिलेने गुरुवारी (दि.15) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून 9082172991 याचा वापरकर्ता मनु स्वामी रोजरिओ ऊर्फ मायकल (रा. भायखळा, मुंबई) व 9867661986 या मोबाईल क्रमांक धारकावर आयपीसी 385, 500, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्य़ादी यांच्या नातेवाईकांना फोन केला. त्याने फिर्यादी व त्यांचा भाऊ यांनी कर्ज घेतले असून ते थकवले आहे. ते कर्ज बुडवे आहेत, अशी बदनामी केली. याबाबत फिर्यादी यांना त्यांच्या नातेवाईकांकडुन समजले. फिर्यादी यांच्या मोठ्या भावाने नातेवाईकांकडून मोबाईल नंबर घेऊन फोन केला.

फिर्यादीच्या भावाने कोणते कर्ज आहे, कोणत्या बँकेचे आहे अशी विचारणा केली असता त्याने बँकेचे नाव न सांगता
मी मायकल आहे. तु आता मोठ्या घरामध्ये राहत आहेस, मी तुझे नातेवाईक शोधुन त्यांना फोन केला आहे.
तू मला 20 मार्च पर्यंत 5 लाख रुपये दिले नाहीत तर तुझे फोटो मॉर्फ करून सोशल मीडिया व नातेवाईकांना पाठवेन
अशी धमकी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणवरे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Election 2024- Maharashtra Cabinet Decisions |लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी शिंदे सरकारचा धडाका, 72 तासात तीन मंत्रिमंडळ बैठका अन् 62 निर्णय

Marged Villages In PMC | पुणे : समाविष्ट 34 गावांच्या मूलभूत सोयी सुविधासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये 9 लोकप्रतिनिधींची सदस्यपदी नियुक्ती

Pune Dattanagar Double Murder Case | पुण्यात दुहेरी खूनाचा प्रकार उघडकीस, पतीकडून पत्नी आणि मुलीचा निर्घृण खून

PSI Dead Body Found In Koregaon Park Pune | पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ