Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे-नाशिक महामार्गावरील ‘सरकार’ लॉजमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन मुलींची सुटका

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे-नाशिक महामार्गावरील (Pune-Nashik Highway) हॉटेल सरकार अँड लॉजवर (Hotel Sarkar & Lodge) मागील काही महिन्यांपासून सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा (Prostitution) पर्दाफाश केला आहे. पैशाचे अमिश दाखवून तरुणींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता. पिंपरी चिंचवडच्या (Pimpri Chinchwad Police) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा टाकून दोन पीडित मुलींची सुटका करुन दोघांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

 

लॉज मॅनेजर अजित संजीवनाल गौतम (वय-21 रा. बागडे वस्ती, महाळुंगे, मुळ रा. उन्नाव, उत्तर प्रदेश), लॉज चालक सुधाकर संजीवा शेट्टी (वय-49 रा. इंद्रायणी नगर, भोसरी) यांच्यावर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Mahalunge MIDC Police Station) गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या ताब्यातून दोन मुलींची सुटका केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये हॉटेल्स, लॉज व स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. पुणे-नाशिक महामार्गावर बागडे वस्ती येथील हॉटेल सरकार रेस्टॉरंट अँड लॉज येथे वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा करुन घेतली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. याठीकाणी मागील काही महिन्यांपासून हा गोरख धंदा सुरु होता. पैशांची फूस लावून दोन तरुणींकडून या व्यवसायात ओढलं गेलं होतं. पोलिसांनी लॉज चालक आणि मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinoy Kumar Choubey),
पोलीस सह आयुक्त संजय शिंदे (Addl CP Sanjay Shinde), अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (Addl CP Vasant Pardeshi),
पोलीस उपायुक्त गुन्हे स्वप्ना गोरे (DCP Swapna Gore),
सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतीश माने (ACP Satish Mane)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण (PI Devendra Chavan),
पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सिंह सिसोदे (PSI Pradeep Singh Sisode), धैर्यशील सोळंके (Darhysheel Solanke),
विजय कांबळे (Vijay Kamble) पोलीस अंमलदार सुनील शिरसाट, सुधा टोके, भगवंता मुठे,
मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव आणि सोनाली माने यांच्या पथकाने केली आहे.

 

 

Web Title :  Pune Pimpri Chinchwad Crime News | police raid on prostitution racket at sarkar lodge on pune nashik highway

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime News | Gang spreads terror in Taljai area of Sahakar Nagar police station;
Vandalise 26 vehicles; Police apprehend notorious criminal Papulya Waghmare

Pune Police Inspector Transfers | 14 Police Inspectors transferred in Pune; They include senior PIs of Swargate,
Mundhwa, Khadki, Alankar, Warje Malwadi, Uttam Nagar, Khadak and Koregaon Park police stations