Pune Pimpri Chinchwad Crime News | प्रकाश गोंधळे खून प्रकरण : जन्मठेप झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील हडपसरमध्ये 2013 साली कोयत्याने वार करुन प्रकाश गोंधळे यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणातील (Prakash Gondhale Murder Case) हिंदू राष्ट्रसेनेचे कार्यकर्ते असलेला अक्षय लक्ष्मण इंगुळकर याचे सह 9 आरोपींना हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली होती. या गुन्ह्यातील नऊ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आरोपी अक्षय इंगुळकर याने जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) अर्ज केला होता. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शाम सी चांडक व ए.एस. गडकरी यांनी आरोपी अक्षय इंगुळकर याचा जामीन मंजूर (Granted Bail) केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

2013 साली हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश गोंधळेंवर हल्ला केला होता. आरोपींनी कोयत्याने वार करुन त्यांचा खून केला. याप्रकरणात हडपसर पोलिसांनी विक्रांत उर्फ विकी भालचंद्र जाधव, वैभव ज्योतीराम भाडळे, अक्षय लक्ष्मण इंगुळकर, श्रीकांत विश्वास आटोळे, अमोल दत्तू शेडगे, राहुल उर्फ पप्पू मारुती कौले, विनोद उर्फ विकी विश्वास पाटील, सुरज मारुती फडके आणि आकाश विठ्ठल शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली होती. गुन्ह्यातील 9 आरोपींना 12 जानेवारी 2023 मध्ये अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. हा खटला दहा वर्षे चालला होता.

प्रकाश गोंधळे हत्या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाच्या निकाला विरोधात मुंबई उच्च न्यायालय येथे अपील करण्यात आले होते. अक्षय लक्ष्मण इंगुळकर याने अपीलामध्ये जामीन मिळणे करिता अर्ज केला होता. अर्जदार हा दहा वर्षे सहा महिने एवढा कालावधी जेलमध्ये आहे. अपील सुनावणीला वेळ लागणार आहे असा युक्तिवाद त्याचे तर्फे करण्यात आला होता. तो युक्तिवाद ग्राह्य धरून मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय लक्ष्मण इंगुळकर यास जामीन मंजूर केला आहे. अक्षय इंगुळकर याचे तर्फे ॲड. सचिन देवकर, ॲड. सचिन डी स्वामी आणि ॲड. अनिकेत थोरात यांनी बाजू मांडली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Fire News | रेंजहिल्स रस्त्यावर अशोकनगर भागात तीन दुकानांना आग

Kondhwa Khadi Machine Chowk | पीएमआरडीएच्या विकास आराखड्यातील कोंढवा खडी मशीन ते मंतरवाडी दरम्यानच्या रस्त्याची रुंदीची माहीती घेउन योग्य ते बदल करण्याचे प्रयत्न करण्यात येतील – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

पिंपरी : भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जेष्ठ नागरिकाचा मृत्यू