Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला 15 वर्षे सक्तमुजरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्नाचे आमिष दाखवुन (Lure Of Marriage) अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Pune Minor Girl Rape Case) करणार्‍या खासगी कोचिंग क्लासच्या नराधम शिक्षकाला (Teacher In Coaching Class) 15 वर्षे सक्तमजुरी आणि 50 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा विशेष न्यायाधीश के.के. जहागिरदार (Special Court Judge K.K. Jahagirdar) यांनी ठोठावली आहे. दंडाची रक्कम भरल्यास अपील कालावधी संपल्यानंतर ती रक्कम पिडीतेला देण्यात यावी असे देखील न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

गोपाळ किसनराव चव्हाण Gopal Kisanrao Chavan (33) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
सदरील गुन्हा हा डिसेंबर 2017 ते 2018 दरम्यान निगडी परिसरात घडला होता.
सदरील प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे (Sr PI Shankar Autade) यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उत्कर्षा देशमुख (PSI Utkarsha Deshmukh) यांनी केला आहे.
गोपाळ चव्हाण हा भागिदारीमध्ये खासगी कोचिंग क्लास चालवत होता.
त्याच्या क्लासमध्ये शिक्षणासाठी येणार्‍या पिडीत अल्पवयीन मुलीला त्याने लग्नाचे आमिष दाखविले
आणि तिच्या इच्छेविरूध्द शारीरिक संबंध (Physical Relation) ठेवले होते.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चव्हाणला अटक केली होती. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. सुचित्रा नरोटे (Adv. Suchitra Narote) यांनी 8 साक्षीदार तपासले.
आरोपीने अल्पवयीन विद्यार्थिनीचे आयुष्य उध्दवस्त केले आहे. हा गुन्हा गंभीर असल्याने आरोपीला
जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी अ‍ॅड. सुचित्रा नरोटे यांनी केली. न्यायालयाने चव्हाणला 15 वर्षे
सक्तमजुरी आणि 50 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Web Title :-  Pune Pimpri Chinchwad Crime News | Private coaching class teacher gets 15 years hard labor for raping minor girl for marriage

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘जागतिक बौद्धिक संपत्ती दिन’ साजरा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : बंडगार्डन पोलिस स्टेशन – विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासूवर गुन्हा दाखल

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : उत्तमनगर पोलिस स्टेशन – ग्रामसेवकाचे अपहरण करुन उकळली खंडणी; कारसमोर फोडली बियरची बाटली, फार्म हाऊसवर ठेवले बांधून