Pune Pimpri Chinchwad Crime News | रावेत येथील वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 2 मुलींची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | रावेत परिसरातील एका खोलीमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Prostitute Business) पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (PCPC Crime Branch) अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली असून दोघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रावेत किवळे रोडवरील एका खोलीत शनिवारी (दि.3) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात (Rawet Police Station) बाळासाहेब मनोहर डाडर
(वय-36 रा. भैरवनाथ मंदिराजवळ, वडगाव शेरी गावठाण, चंदननगर, मुळ रा. मु.पो. नागलवाडी पो. बाभुळगाव ता. कर्जत जि. अहमदनगर), दिपक यादव (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्या विरुद्ध आयपीसी 370 (3), 34 सह अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून बाळासाहेब डाडर याला अटक केली आहे. याबाबत अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस हवालदार भगवंता चिंधु मुठे यांनी फिर्याद दिली आहे.

रावेत येथील रावेत किवळे रोडवरील एका खोलीत वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाला समजली.
त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली.
त्यानंतर त्याठिकाणी छापा टाकून दोन तरुणींना ताब्यात घेतले. आरोपी पीडित मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते.
वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात समोर आले.
पुढील तपास पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक चाटे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune CP Amitesh Kumar | अवैध धंद्यांना मुक संमती देणार्‍या तसेच त्यामध्ये प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या सहभागी असणार्‍यांवर कठोर कारवाई करणार – पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Maharashtra IAS Officer Transfer | राज्यातील 7 सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या, विभागीय आयुक्त सौरभ राव यांची बदली

Namo Maharojgar Melava | बेरोजगारांना दिलासा! राज्य सरकार आयोजित करणार ‘नमो महारोजगार मेळावे’; मंत्रिमंडळ बैठकीत २० महत्त्वाचे निर्णय

Vijay Wadettiwar On CM Eknath Shinde | ”वर्षा निवासस्थान गुंडांचे आश्रयस्थान झालेय का?”, गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावरून वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल!