Maharashtra IAS Officer Transfer | राज्यातील 7 सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या, विभागीय आयुक्त सौरभ राव यांची बदली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (Maharashtra IAS Officer Transfer) करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी (दि.5) जारी करण्यात आले आहेत. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव (IAS Saurabh Rao) यांची बदली करण्यात आली असून त्यांची आयुक्त, सहकार आणि निबंधक, सहकारी संस्था पुणे येथे बदली करण्यात आली आहे. तर साखर आयुक्त म्हणून अनिल एम. कवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या अधिकाऱ्यांची झाली बदली

  1. सौरभ राव (IAS:MH:2003) – विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांची आयुक्त, सहकार आणि निबंधक, सहकारी संस्था, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
  2. अनिल एम. कवाडे (IAS:MH:2003) – आयुक्त, सहकार आणि निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांची साखर आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  3. अनिल पाटील (IAS:MH:2012) – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांची व्यवस्थापकीय संचालक, Haffkine Bio-Pharma Corporation, Mumbai या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
  4. डी.के.खिलारी (IAS:MH:2013) – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांची संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
  5. राहुल गुप्ता (IAS:MH:2017) – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धाराशिव यांची सह व्यवस्थापकीय संचालक, MAHADISCOM, छत्रपती संभाजी नगर येथे नियुक्ती केली आहे.
  6. मुरुगानंथम एम (IAS:MH:2020) – प्रकल्प अधिकारी, ITDP, चंद्रपूर आणि सहायक जिल्हाधिकारी, चंद्रपूर उपविभाग, चंद्रपूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
  7. यशनी नागराजन (IAS:MH:2020) – प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा आणि सहायक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | प्राचीन भारताविषयी जागृती करण्यात हेरिटेज सेंटर मोलाची भूमिका बजावेल – नितीनभाई देसाई, ज्येष्ठ उद्योगपती

यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या ( PI, API) बदल्या व नेमणूका

Uddhav Thackeray | ”फडणवीस कुठे आहेत? मी ऐकले लापता आहेत”, भाजपा आमदार गोळीबार प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा घणाघात

Pune Police News | पुणे शहरातील 77 सहाय्यक पोलिस निरीक्षक / पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या होणार