Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : व्यवसाय सुरु करण्याच्या बहाण्याने 33 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | कॅमेरा बनवण्यासाठी लागणाऱ्या मशिन खरेदीचा व्यवसाय सुरु करुन मिळणारा नफा वाटून घेऊ असे आमिष दाखवून एका व्यक्तीची 33 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी नागपूर येथील एका व्यक्तीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2022 ते 11 जुलै 2023 या कालावधीत खराडे येथील पठारे वस्ती येथे घडली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत मोहम्मद आसीम जियाउद्दीन शेख (वय-28 रा. पठारे वस्ती, ठुबे, खराडी, पुणे) यांनी सोमवारी (दि.5) चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन रजत ईश्वर गोलार (रा. नागपूर) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. रजत गोलार याने फिर्य़ादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांना कॅमेरा बनविणारी मशी खरेदीचा व्यवसाय करुन त्यातून मिळणारा नफा वाटून घेण्याचे आमिष दाखवले. त्याने फिर्यादी यांच्याकडून 64 लाख 88 हजार 949 रुपये घेतले. मात्र, आरोपीने मशिन खरेदी केले नाही. त्यामुळे फिर्य़ादी यांनी आरोपीकडे पैशांची मागणी केली.

त्यावेळी त्याने 36 लाख 79 हजार 445 रुपये परत केले. यानंतर शेख यांनी उर्वरित पैशांची मागणी आरोपीकडे केली.
आरोपीने पैसे देण्यास टाळाटाळ करुन शेख यांची फसवणूक केली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेख यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता.
या तक्रार अर्जाची चौकशी करुन चंदननगर पोलिसांनी आरोपी रजत गोलार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC – Swachh Bharat Mission | स्वच्छ भारत मिशनच्या नावाखाली महापालिकेची तिजोरी ‘स्वच्छ’? 600 टन टिपिंग फी दिली जात असताना प्रशासन 875 रुपये टिपिंग फीचा प्रस्ताव मान्य करणार !

तीन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य, नराधमास अटक; कोंढवा परिसरातील प्रकार

Maharashtra Police Suicide News | गळफास घेऊन पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

पुणे : अश्लील हावभाव करुन महिलेचा विनयभंग, पतीला जीवे मारण्याची धमकी