Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार, एकला अटक 3 अल्पवयीन ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर चार जणांनी हल्ला करुन कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यातील संभाजीनगर येथे घडली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एकाला अटक करुन तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार धनकवडी येथे शुक्रवारी (दि.19) रात्री दहाच्या सुमारास संभाजीनगर येथील हनुमान मंदिराजवळ घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत रमेश रामभाऊ कचरे (वय-17 रा. संभाजीनगर, धनकवडी, पुणे) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन विक्की कांबळे (वय-24) याला अटक केली आहे. तर तीन अल्पवयीन मुलांवर आयपीसी 323, 326, 504, 506, 34 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश हा शुक्रवारी (दि.19) त्याच्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हनुमान मंदिराजवळ गेला होता. त्यावेळी आरोपी अल्पवयीन मुलाने रमेश याला आडवून रागाने पाहिले. त्यावेळी रमेश याच्या मित्राने आरोपीला रागाने का बघतो अशी विचारणा केली. याचा राग आल्याने आरोपी व रमेश याच्या मित्रासोबत शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचा राग आरोपीच्या मनात होता. फिर्य़ादी रमेश हनुमान मंदिराजवळ पताका लावत होता. त्यावेळी अल्पवयीन आरोपी व त्याचे इतर साथीदार हतात कोयते घेऊन आले. त्यांनी रमेश कचरे याला शिवीगाळ करुन तोंडावर मारले. तसेच इतर आरोपींनी फिर्यादी याच्या डोक्यावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पठारे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | कॉलेजमध्ये झालेल्या वादातून तरुणाला घरात घुसून मारहाण, फुरसुंगी येथील घटना

Pune Pimpri Chinchwad Crime News | महिलेचा पाठलाग करुन विनयभंग, एकाला अटक; खराडी परिसरातील प्रकार