Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : आरटीओतील भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषणासाठी बसलेल्या कार्यकर्त्याला मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यातील आरटीओ कार्यालयातील (Pune RTO Office) भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषणासाठी बसलेल्या ऑल इंडिया वाहन चालक-मालक संघटना (All India Vehicle Drivers-Owners Association) महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या कार्यकर्त्याला बांबूने व हत्याराने मारहाण केली. हा प्रकार रविवारी (दि.4) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ससून हॉस्पिटल समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या बाहेरील फुटपाथवर घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत अजय पोपट मखरे (वय-23 रा. दत्त मंदिराजवळ, वाकड) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन नितीन परदेशी (वय-30), देवा खिवनसरा, विनोद जाधव व एका अनोळखी व्यक्तीवर आयपीसी 324, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ऑल इंडिया वाहन चालक-मालक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे कार्यकर्ते आहेत.
ते ससून हॉस्पिटल समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या बाहेरील फुटपाथवर पुणे आरटीओ कार्य़ालयातील भ्रष्टाचाराविरोधात उपोषणाला बसले आहेत.
रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास फिर्य़ादी यांचे ओळखीचे आरोपी त्याठिकाणी आले.
आरोपींनी उपोषणाला का बसतो असे म्हणत फिर्यादी यांना शिवीगाळ केली.
तसेच त्यांनी सोबत आणलेल्या लाकडी बांबूने आणि लोखंडी हत्याराने मारहाण करुन जखमी केले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनवडे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gangster Hemant Dabhekar Meet Srikant Shinde | गँगस्टर शरद मोहोळचा राइट हॅन्ड पोहोचला ‘वर्षा’वर, कुख्यात गँगस्टरने घेतील खासदार श्रीकांत शिंदेंची भेट

Pune Police PSI Suspended | पुणे विद्यापीठातील ललित केंद्रामध्ये झालेल्या गोंधळानंतर पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन

पुणे : मॅट्रिमोनी साइटवरील ओळख तरुणीला पडली महागात, लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

Nagpur Crime News | पंतप्रधानांच्या बॅनरचे विद्रुपीकरण युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला अटक; काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी केला निषेध, काँग्रेसकडून कुणाल राऊत यांना घरचा आहेर

पुण्यात नात्याला काळीमा! अल्पवयीन पुतणीवर बलात्कार, गर्भपात केल्याप्रकरणी चुलत्याला अटक