Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : गाडीला कट मारल्याच्या कारणावरुन दोन टोळक्यांमध्ये सार्वजनिक रोडवर राडा; 7 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | गाडीला कट मारल्याच्या कारणावरुन दोन टोळ्यांमध्ये दगडाने हाणामारी झाली. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करुन सात जणांना अटक केली आहे. हा प्रकार ए.डी. कॅम्प चौकातील सार्वजनिक रोडवर रविवारी (दि.4) सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

रिहान जिलानी सय्यद (वय-22 रा. भवानी पेठ) याने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) दिलेल्या फिर्यादीवरुन आदित्य सदानंद गायकवाड (रा. राजेवाडी, पुणे) व स्वप्नील गायकवाड यांना अटक केली आहे. तर रचित रवी बोधने, रवी बोधने व इतर दोन अनोळखी तरुणांवर आयपीसी 326, 324, 323, 504, 506, 143, 147, 149 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिहान याचा भाऊ आयान दुचाकीवरुन जात असताना आरोपी आदित्य याने आयानच्या गाडीला कट मारुन शिवीगाळ केली. त्याने बेकायदेशीर जमाव जमा करुन वाद घातला. भांडण सोडवण्यासाठी रिहानचे वडील गेले असता स्वप्नील याने काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच रचित बोधने याने आयाच्या कपाळावर दगड मारुन जखमी केले. फिर्य़ादी याचे चुलते व मित्रांना काठीने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

तर आदित्य सदानंद गायकवाड (वय-21 रा. राजेवाडी, नाना पेठ) याने दिलेल्या फिर्य़ादीवरुन रिहान सय्यद (वय-19),
आयान सय्यद, जिलाणी सय्याद (वय-41), आफताब इनामदार (वय-22), मोहसीन पटेल (वय-35) यांच्यावर आयपीसी
326, 324, 323, 504, 506, 143, 147, 149, सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
आरोपी रिहान व आयान सय्यद आणि फिर्य़ादी आदित्य यांच्यामध्ये गाडीला कट मारल्याच्या कारणावरुन वाद झाला होता.
याचा राग मनात धरुन आरोपी आयान याने फिर्यादी याचा मित्र रचित बोधने याला दगडाने मारहाण केली.
ही भांडणे सोडवण्यासाठी रचित याचे वडिल रवी बोधने मध्ये आले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करुन डोक्यात
दगड मारुन जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune CP Amitesh Kumar | अवैध धंद्यांना मुक संमती देणार्‍या तसेच त्यामध्ये प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या सहभागी असणार्‍यांवर कठोर कारवाई करणार – पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Maharashtra IAS Officer Transfer | राज्यातील 7 सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या, विभागीय आयुक्त सौरभ राव यांची बदली

Namo Maharojgar Melava | बेरोजगारांना दिलासा! राज्य सरकार आयोजित करणार ‘नमो महारोजगार मेळावे’; मंत्रिमंडळ बैठकीत २० महत्त्वाचे निर्णय

Vijay Wadettiwar On CM Eknath Shinde | ”वर्षा निवासस्थान गुंडांचे आश्रयस्थान झालेय का?”, गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावरून वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल!