Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : बिल्डरची पावणे दोन कोटींची फसवणूक, कुणाल हौसिंगच्या भागिदारांवर FIR

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | आर्थिक अडचणीमुळे विकसन करण्यासाठी दिलेल्या जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर स्वत:च्या नावाची नोंद केली. तसेच चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून बिल्डरची पावणे दोन कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्या प्रकरणी पुण्यातील कुणाल हौसिंगच्या तीन भागिदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नळस्टॉप, कर्वेरोड येथे कुणाल हौसिंगच्या कार्यालयात 2005 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत कॉस्मो डेव्हलपर्सचे भागिदार अनुप विजय मुंदडा (वय-37 रा. ओरायन रेसिडंन्सी, सालेसबरी पार्क, गुलटेकडी, पुणे) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन कुणाल हौसिंग नोंदणीकृत भागीदारी संस्थेचे भागीदार हेमंत डाह्याभाई शहा, रमेश गिरधरदास शहा, जितेंद्र सुरेश मेहता यांच्यावर आयपीसी 409, 420, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

ADV

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या कॉस्मो डेव्हलपर्स या भागीदारी फर्मने बाणेर येथील जमीन विकसनासाठी घेतली होती. मात्र, आर्थिक अडचणीमुळे ते विकसन करु शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी ही जमीन कुणाल हौसिंगच्या भागिदारांवर विश्वास ठेवून विकसन करण्यासाठी दिली होती. आरोपींनी अनुप मुंदडा यांचा विश्वास संपादन करुन चांगला परतावा देण्याची हमी देऊन विकसन करार केला.

करारनामा करताना फिर्य़ादी यांना 2 कोटी 14 लाख 46 हजार 400 रुपे परतावा देण्याचे ठरले होते.
मात्र आरोपींनी फिर्यादी यांची दिशाभूल करुन करारनामा करताना ठरलेल्या परताव्यापैकी 1 कोटी 67 लाख 81 हजार 952
रुपये न देता फसवणूक केली. तसेच कुलमुखत्यार पत्राचा गैरवापर करुन त्या जमिनीच्या उताऱ्यावर
बेकायदेशीररीत्या स्वत:च्या नावाची नोंदणी करुन फिर्यादी यांची फसवणूक केली.
याबाबत विचारणा केली असता आरोपींनी फिर्यादी यांना बघून घेण्याची धमकी दिली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

जेवण बनवले नाही म्हणून पत्नीवर चाकूने वार, हडपसर परिसरातील घटना

पोलीस अधिकाऱ्याला झाडाची कुंडी फेकून मारत आत्महत्या करण्याची धमकी, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील प्रकार

पुण्यातील नऱ्हे परिसरातील फ्लॅटमध्ये वडील, मुलगा मृतावस्थेत आढळले, परिसरात खळबळ

तळेगाव दाभाडे : सुट्या पैशांवरून वाहकासोबत हुज्जत घालणाऱ्या महिलेसह तिघांवर FIR

Pune Police News | पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची ‘या’ गोष्टींना असणार प्राथमिकता (Video)