Pune Pimpri Chinchwad Crime News | जेवण बनवले नाही म्हणून पत्नीवर चाकूने वार, हडपसर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | जेवण बनवले नाही म्हणून पतीने पत्नीवर कांदा कापण्याच्या चाकून वार करुन जखमी केले. हा प्रकार हडपसर परिसरात झेड कॉर्नर, मांजरी बुद्रुक येथे गुरुवारी (दि.1) रात्री साडेबाराच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत नमिता श्रावण माने (वय-33 रा. जी एत कॉम्प्लेक्स, झेड कॉर्नर, मांजरी बुद्रुक) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन श्रावण राम मान (वय-37) याच्यावर आयपीसी 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती कारणावरुन व जेवण बनवले नाही या कारणावरुन आरोपी आणि फिर्यादी यांच्यात वाद सुरु होता. वाद सुरु असताना आरोपी पतीने घरातील कांदा कापण्याच्या चाकूने पत्नी नमिता हिच्या हातावर वार केले. तसेच तिला मारहाण करुन जखमी केले. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

वाहतूक कोंडीचा राग रिक्षाचालकावर

वाहतूक कोंडी झाल्याने एका दुचाकीस्वाराने रिक्षाचालकाला लोखंडी हत्याराने डोक्यात व पाठीवर मारहाण करुन जखमी केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे. हा प्रकार 31 जानेवारी रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास नवाजीश चौक व संडे बाजार रस्त्यावर घडला. याबाबत समीर सलीम शेख (वय-49 रा. भवानी चाळ, शिवनेरीनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन दुचाकीवरील अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

समीर शेख हे नवाजीश चौकातून त्यांच्या रिक्षातून जात होते. त्यावेळी चौकात वाहतूक कोंडी झाली होती. त्यावेळी दुचाकीवरुन एक व्यक्ती शेख यांच्या जवळ आला. त्याने विनाकारण त्यांना शिवीगाळ केली. याचा जाब विचारला असता त्याने गाडी रस्त्याच्या कडेला लावली. एक लोखंड हत्यार घेऊन शेख यांच्या जवळ आला. हत्याराने शेख यांच्या डोक्यात व पाठीवर मारहाण करुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तळेगाव दाभाडे : सुट्या पैशांवरून वाहकासोबत हुज्जत घालणाऱ्या महिलेसह तिघांवर FIR

नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मावळते पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला

गोळीबार करुन सराफा व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न, सराईत गुन्हेगाराला अटक; पुणे ग्रामीण पोलिसांकडून तीन पिस्टल व दोन काडतुसे जप्त

चारचाकी गाडीची काच फोडून लुटणाऱ्या ऋषिकेश पवार टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 118 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

चैनीसाठी दुचाकी चोरी करणाऱ्याला हिंजवडी पोलिसांकडून अटक, 12 दुचाकी जप्त

मुंढवा पोलिसांनी जपली माणुसकी! पोलिसांनी घडविली आई-मुलाची तब्बल 12 वर्षानंतर भेट