Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : लाईट गेल्याच्या रागातून महावितरण कर्मचाऱ्यांना बांबूने मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | आकाशवाणी कॉलनी भागातील लाईट गेल्याने एच टी केबल च्या जॉईंटचे टेस्टिंग करत असताना एका व्यक्तीने महावितरण कंपनीच्या (Mahavitaran Company) दोन कर्मचाऱ्यांना (वायरमन) लाकडी बांबूने बेदम मारहाण केली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी एकावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत महावितरणचे कर्मचारी प्रमोद रमेश वाकोडे (वय-35 रा. एम.एस.ई.बी. कॉलनी, अशोकनगर, पुणे) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन राजेश ओमप्रकाश तुसाम (रा. चाफेकर नगर, पुणे) याच्यावर आयपीसी 353, 332, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.22) सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास मोफतलाल बंगल्याजवळ घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशवाणी कॉलनी भागात सोमवारी रात्री लाईट गेली होती.
त्यामुळे फिर्यादी हे मोफतलाल बंगल्याजवळ एच टी केबलच्या जॉईंटचे टेस्टिंग करत होते.
त्यावेळी आरोपी राजेश त्याठिकाणी आला. त्याने माझ्या घरात कालपासून लाईट नाही असे म्हणत रागाने हातातील
बांबूने फिर्यादी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यात फिर्यादी यांच्या हाताला आणि डोक्याला मार लागल्याने ते जखमी झाले. भांडण सुरु असताना फिर्यादी यांचे सहकारी वायरमन सागर हे भांडण सोडवण्यासाठी आले. आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक केकाण करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : बदनामी करण्याची धमकी देऊन शारीरिक संबंधाची मागणी, मित्रावर गुन्हा दाखल

कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण, एकाला अटक; लष्कर परिसरातील घटना

चुलत्याकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पुण्यातील धक्कादायक घटना

मौजमजेसाठी रिक्षा चोरणारा भारती विद्यापीठ पोलिसांकडून गजाआड, दोन रिक्षा जप्त

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, लग्नास नकार देणाऱ्या तरुणाला समर्थ पोलिसांकडून अटक

Pavitra Portal | स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती, पवित्र पोर्टलवरील जाहिरात प्रक्रिया मुदतीत पूर्ण करा

बहिणीबाबत विचारणा केल्याने नातेवाईक तरुणांना मारहाण, महाळुंगे परिसरातील प्रकार

Pune News | फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (FTII) ‘बाबरी’ वरुन राडा, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक (Video)