Pavitra Portal | स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती, पवित्र पोर्टलवरील जाहिरात प्रक्रिया मुदतीत पूर्ण करा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर (Pavitra Portal) आरक्षणानुसार विषयनिहाय रिक्त पदे नोंद करुन जाहिरात देण्याची सुविधा 15 जानेवारी 2024 पर्यंत दिली होती. यानंतर जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश जाहिरातीत व्हावा यासाठी ही मूदत 22 जानेवारी पर्यंत वाढवण्यात आली होती. व्यवस्थानांनी पोर्टलवर नोंदणी करुन जाहिरातीतील आरक्षणविषयक माहितीची नोंद करण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे या कालावधीत पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया 24 जानेवारी पर्यंत पूर्ण करता येणार आहे.

विभागीय शिक्षण उपसंचालक/शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पवित्र पोर्टलवरील प्रलंबित जाहिराती पूर्ण कराव्यात. तसेच तपासून दिल्यानंतर संबंधित व्यवस्थापनांनी 7 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णया मधील तरतुदींनुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील वर्तमानपत्रात प्रसिद्धीस देण्याची कार्यवाही करावी.

दिलेल्या मुदतीत पोर्टलवर जाहिरात दिल्यानंतर आलेल्या सर्व जाहिराती पात्र उमेदवारांना एकत्रित पाहण्याची सुविधा 29 जानेवारी 2024 पर्यंत देण्यात येणार आहे.

पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील अर्हतेनुसार पात्र उमेदवारांना यथाशीघ्र प्राधान्यक्रम उपलब्ध करुन दिला जाईल.
या बाबतच्या सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्या जातील.
वर नमूद केल्याप्रमाणे https://tait२०२०.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन दिलेल्या मुदतीत कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Rohit Pawar | उद्या ED कार्यालयात माझ्यासोबत शरद पवार, सुप्रिया सुळे येणार, रोहित पवारांची माहिती, कार्यकर्त्यांना म्हणाले…

Lok Sabha Elections 2024 | लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपाबाबत काँग्रेस प्रभारींनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले…

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची भाजपावर जोरदार टीका, ”यांच्याशी युती केल्याचा आज मलाही पश्चाताप होतोय…”

पिंपरी : ‘तु माझ्या घरच्यांचे फोन का उचलते?’ पत्नीला लाटण्याने मारहाण, पती विरोधात FIR

पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद, सासरच्या लोकांकडून जावयाला दगडाने मारहाण; कोंढवा परिसरातील प्रकार