Pune Pimpri Chinchwad Crime News | बहिणीबाबत विचारणा केल्याने नातेवाईक तरुणांना मारहाण, महाळुंगे परिसरातील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | बहिणीबाबत विचारणा केल्याच्या कारणावरुन दोन तरुणांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) दिल्याचा प्रकार खेड तालुक्यातील निघोजे येथील सैनी कंपनी समोरील रोडवर घडला आहे. हा प्रकार रविवारी (दि.21) रात्री साडे दहाच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत योगेश अनिल चव्हाण (वय-21 सध्या रा. सावरदरी, ता. खेड मुळ रा. मु.पो. तोतोला ता. लोणार जि. बुलढाना) यांनी सोमवारी (दि.22) महाळुंगे पोलीस ठाण्यात (Mahalunge Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन निलेश विलास राठोड (वय-25 रा. कड वस्ती, निघोजे-कुरळी रोड, कुरळी), नारायण मधुकर चव्हाण (वय-25 रा. मंत्रा सिटी निघोजे), कृष्णा उत्तम जाधव (वय-30 रा. निघोजे, ता.खेड) यांच्यावर आयपीसी 326, 323 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकमेकांचे ओळखीचे व नातेवाईक आहेत.
फिर्यादी यांची चुलत बहिण कोठेतरी निघून गेली आहे.
त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपी निलेश राठोड याला फोन करुन बहिणीबाबत चौकशी केली.
त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना शिवागाळ करुन सैनी कंपनीजवळ बोलावून घेतले.
फिर्यादी व त्यांचा चुलत भाऊ आकाश रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास कंपनीजवळ गेले.
त्यावेळी आरोपी निलेश याने फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने डोक्यात मारुन जखमी केले.
तसेच इतरांन फिर्यादी यांच्या चुलत भावाला धक्कबुक्की करुन मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Rohit Pawar | उद्या ED कार्यालयात माझ्यासोबत शरद पवार, सुप्रिया सुळे येणार, रोहित पवारांची माहिती, कार्यकर्त्यांना म्हणाले…

Lok Sabha Elections 2024 | लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपाबाबत काँग्रेस प्रभारींनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले…

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची भाजपावर जोरदार टीका, ”यांच्याशी युती केल्याचा आज मलाही पश्चाताप होतोय…”

पिंपरी : ‘तु माझ्या घरच्यांचे फोन का उचलते?’ पत्नीला लाटण्याने मारहाण, पती विरोधात FIR

पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद, सासरच्या लोकांकडून जावयाला दगडाने मारहाण; कोंढवा परिसरातील प्रकार