Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार, तरुणावर पोक्सो अंतर्गत FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्नाचे आमिष दाखवून मुलगी अल्पवयीन असल्यापासून वारंवार लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2019 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत पीडित मुलीच्या घरी, बिबवेवाडी, गोकुळनगर, कात्रज येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत धनकवडी येथे राहणाऱ्या 19 वर्षीय मुलीने रविवारी (दि.4) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन प्रकाश हंसाराम चौधरी (वय-24 रा. खराडी, पुणे) याच्यावर आयपीसी 376, 376/2/जे, 506, पोक्सो अॅक्ट 3(ए), 4, 5(एल) (एन), 6, 8, 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 15 वर्षाची असल्यापासून आरोपीला ओळखते.
आरोपीने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्या घरी जाऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध
ठेवले. तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर ‘मी तुला व तुझ्या घरच्यांना शुट करुन टाकीन’ अशी धमकी देऊन तिच्यासोबत गैरवर्तन केले. आरोपीने मुलीला वेळोवेळी बोलावून घेत तिला बिबवेवाडी, कात्रज परिसरातील लॉजवर नेऊन लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने लग्नास नकार दिल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुलीने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक निकम करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जाताना पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले

पत्नीबाबत अपशब्द बोलणे भोवले ! नर्‍हेच्या डोंगराजवळ तरुणाचा खून, सराईत गुन्हेगाराला अटक

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक

Uttarakhand Revolutionizes Live-In Relationships: Mandatory Self-Declaration Certificates Introduced

Upholding Equality in Marriage: Uttarakhand Committee Proposes Revolutionary Changes