Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : मानसिक त्रासातून गरोदर महिलेची आत्महत्या, पतीसह तिघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यातील चंदननगर परिसरातील खराडी येथे एका विवाहित गरोदर महिलेने सासरच्या लोकांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या (Suicide Case) केली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल करुन सासऱ्याला अटक केली आहे. हा प्रकार मे 2023 ते आजपर्यंत राघोबा पाटीलनगर, खराडी येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

प्रणिता आकाश गायकवाड (वय-22) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत मयत प्रणिताचे काका नचिकेत शिवाजी भोसले (वय-40 रा. किंगस्टन एलिशिया सोसायटी, पिसोळी) यांनी गुरुवारी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन पती आकाश गायकवाड (वय-26), सासु लक्ष्मीबाई गायकवाड (वय-45), सासरे अंकुश गायकवाड (वय-50) यांच्यावर आयपीसी 304 ब नुसार गुन्हा दाखल करुन अंकुश गायकवाड यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पुतणी प्रणिता हिचा विवाह आकाश याच्यासोबत 21 मे 2023 रोजी
झाला होता. लग्नानंतर दोन महिन्यांनी प्रणिताचा पती व इतर आरोपींनी संगनमत करुन छोट्या कारणावरुन प्रणिताला त्रास देण्यास सुरुवात केली. तुला स्वयंपाक नीट येत नाही, लग्न मोठे करुन दिले नाही, लग्नात मानपान केला असे बोलून मानसिक त्रास दिला. तसेच ती गरोदर असताना डोहाळ जेवण मोठे करुन द्या अशी मागणी आरोपींनी केली. मात्र, माहेरची परिस्थिती गरीब असल्याने त्या गोष्टीचे प्रणिताने टेन्शन घेतले. यातूनच तिने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हंबीर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

जेवण बनवले नाही म्हणून पत्नीवर चाकूने वार, हडपसर परिसरातील घटना

पोलीस अधिकाऱ्याला झाडाची कुंडी फेकून मारत आत्महत्या करण्याची धमकी, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील प्रकार

पुण्यातील नऱ्हे परिसरातील फ्लॅटमध्ये वडील, मुलगा मृतावस्थेत आढळले, परिसरात खळबळ

तळेगाव दाभाडे : सुट्या पैशांवरून वाहकासोबत हुज्जत घालणाऱ्या महिलेसह तिघांवर FIR

Pune Police News | पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची ‘या’ गोष्टींना असणार प्राथमिकता (Video)