Pune Pimpri Chinchwad Crime News | अपहरण करण्याची धमकी देऊन महिलेचा विनयभंग, मार्केट यार्ड परिसरातील हॉटेल मधील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हॉटेलच्या किचनमध्ये शिरून महिलेसोबत अश्लील कृत्य करून विनयभंग (Molestation Case) केल्याची धक्कादायक घटना मार्केटयार्ड परिसरात घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.16) दुपारी बाराच्या सुमारास मार्केटयार्ड परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये घडली आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत मार्केटयार्ड परिसरात राहणाऱ्या 31 वर्षीय महिलेने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन लक्ष्मण अमृत घाडगे (वय-40) याच्यावर आयपीसी 354, 354अ, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे मार्केटयार्ड येथे हॉटेल आहे. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास आरोपी लक्ष्मण घाडगे हॉटेलमध्ये बिर्याणी खाण्यासाठी आला होता. त्याने फिर्यादी यांच्या पतीकडे बिर्याणीची मागणी केली असता त्यांनी अर्धातास लागेल असे सांगितले. यानंतर फिर्यादी यांचे पती कंस्ट्रक्शन साईवर गेले. दरम्यान, फिर्यादी हॉटेलच्या किचनमध्ये बिर्याणी तयार करत होत्या. त्यावेळी आरोपी किचनमध्ये आला. त्याने फिर्यादी यांच्या लागावर हात फिरवून गैरवर्तन केले. तसेच बिर्याणी चांगली बनवण्यास सांगून बिर्याणी चांगली झाली नाहीतर तुला किडनॅप करेन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून पंचतारांकित हॉटेलवर छापा; हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, राजस्थानी अभिनेत्रिसह २ विदेशी तरुणींची सुटका (Video)