Pune Crime News | गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून पंचतारांकित हॉटेलवर छापा; हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, राजस्थानी अभिनेत्रिसह २ विदेशी तरुणींची सुटका (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | विमाननगर (Viman Nagar Pune) परिसरातील एका हॉटेलमधील वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell Pune) हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत राजस्थानी अभिनेत्रिसह (Rajasthani Actress) उझबेकिस्तान (Uzbekistan) मधील दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. तर दोन दलालांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

या प्रकरणी विमाननगर पोलीस ठाण्यात इरफान उर्फ राहुल मदन उर्फ मदन सन्यासी आणि रोहित (पूर्ण नाव पत्ता महित नाही) यांच्या विरुद्ध आयपीसी 370, 34 सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला पोलीस हवालदार मनिषा सुरेश पुकाळे यांनी फिर्याद दिली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.16) सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास निको गार्डन रोडवरील एका हॉटेलच्या खोलीत करण्यात आली.

विमाननगर येथील निको गार्डन रोडवरील हॉटेल इंटरनॅशनलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला समजली. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली. त्यानंतर हॉटेलमधील दोन रुममध्ये छापा टाकून उझबेकिस्तान आणि राजस्थान येथील तीन तरुणींना ताब्यात घेतले. सुटका करण्यात आलेल्या तरुणींपैकी एक तरुणी राजस्थानी अभिनेत्री असल्याचे तपासात समोर आले आहे.

आरोपींनी हॉटेलमध्ये दोन रूम बुक करुन त्याठिकाणी पीडित मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते.
वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात समोर आले.
पोलिसांनी 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपी कोरेगाव पार्क येथील द ओ हॉटेलमध्ये रुम बुक करुन पीडित तरुणींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे तपासात उघड झाले आहे. पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त (अति.कार्य.) आणि अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे,
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव,
सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलिस उप निरीक्षक आश्विनी भोसले,
पोलिस अंमलदार राजेंद्र कुमावत, सागर केकाण, तुषार भिवरकर, मनिषा पुकाळे, ओंकार कुंभार, रेश्मा कंक,
हनुमंत कांबळे, अजय राणे, बाबा कर्पे, किशोर भुजबळ यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लाच घेताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह खाजगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात