Pune Pimpri Chinchwad Crime News | अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या रोड रोमिओला आळंदी पोलिसांकडून अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | शाळेत जात असताना रोडने पाठलाग करुन एका अल्पवयीन 12 वर्षाच्या मुलीची छेड काढून विनयभंग (Molestation) करणाऱ्या रोड रोमिओला (Road Romeo) आळंदी पोलिसांनी (PCPC Police) अटक केली आहे. हा प्रकार 15 डिसेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास आवारे हॉस्पिटल ते 4 नंबर शाळा या दरम्यान घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पीडित मुलीच्या 40 वर्षीय वडिलांनी आळंदी पोलीस ठाण्यात (Alandi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन देवानंद गणेश कदम Devanand Ganesh Kadam (वय-24 रा. वडगाव रोड, आळंदी) याच्यावर आयपीसी 354(ड), 341, 506(2) सह पोक्सो अॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी 12 वर्षाची आहे हे माहीत असताना देखील आरोपीने तिच्या मोबाईलवर स्वत:चा फोटो व स्टेटस व्हिडिओ पाठवला. फिर्यादी यांची मुलगी आळंदी येथील 4 नंबर शाळेत शिकते. ती शाळेत जात असताना आरोपीने तिचा रोडने पाठलाग केला. तसेच शाळेच्या गेटवर जावून तिचे पुढे थांबून तिची वाट आडवली. तसेच तिला फोन करुन मानसिक त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक माने (PSI Mane) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ashok Chavan | अशोक चव्हाण वंचितच्या इंडियातील समावेशावर म्हणाले, ”माझी व्यक्तिगत भूमिका आहे की…”

Health Benefits of Guava | थंडीत का सेवन करावा पेरू? ९९% लोक ‘खावा की खाऊ नये’ याबाबत असतात कन्फ्यूज!

Pune Lok Sabha | ‘है तैयार हम…’ ! लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत; लाखोंच्या उपस्थितीत नागपूर महारॅलीत रणशिंग फुंकणार – माजी आमदार मोहन जोशी

कोरेगाव पार्क, खडकी परिसरात घरफोडी, 14 लाखांचा ऐवज लंपास