Pune Lok Sabha | ‘है तैयार हम…’ ! लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत; लाखोंच्या उपस्थितीत नागपूर महारॅलीत रणशिंग फुंकणार – माजी आमदार मोहन जोशी

Pune Lok Sabha | 'Hai ready hum...' ! We are ready for the Lok Sabha elections; Former MLA Mohan Joshi will blow trumpet in Nagpur Maharalli in the presence of lakhs

पुणे – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Pune Lok Sabha) ‘है तैयार हम’ अशा निर्धाराने काँग्रेस कार्यकर्ते सज्ज झाले असून, नागपूर येथे दि.२८ डिसेंबर रोजी होणाऱ्या विशाल रॅलीत लाखोंच्या संख्येने सहभागी होतील, अशी माहिती माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Congress Leader Mohan Joshi) यांनी दिली. (Pune Lok Sabha)

राष्ट्रीय काँग्रेस (Congress) पक्षाच्या १३९व्या स्थापना दिनानिमित्त नागपूर येथे ‘है तैयार हम’ महारॅली आयोजित करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे (Mallikarjunji Kharge), काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी (Sonia Gandhi), पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi), प्रियांका गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला, देशातील काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही रॅली होणार आहे. या महारॅलीमध्ये लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला अनुकूल वातावरण तयार झाल्याची मतं ताज्या सर्व्हेंमधून दिसून आलेली आहेत. या वातावरणात लक्षावधी कार्यकर्ते नागपूर येथील महारॅलीत सहभागी होतील. पुणे शहर आणि जिल्ह्यातूनही शेकडो कार्यकर्ते रॅलीत सहभागी होण्यासाठी नागपूरकडे रवाना होणार आहेत, अशी माहिती मोहन जोशी यांनी पत्रकात दिली आहे. (Pune Lok Sabha)

देशात लोकशाही टिकविण्याचा निर्धार काँग्रेसजनांनी केलेला आहे. दलित, अल्पसंख्याक यांच्यावर होणाऱ्या
अत्याचाराला विरोध, महागाई, बेरोजगारी याचा निषेध आणि १४६ खासदारांना निलंबित केल्याचा जाब या
महारॅलीत सरकारला विचारला जाईल. महारॅलीत कार्यकर्त्यांना प्रेरणादायी संदेश दिला जाईल, असे मोहन जोशी यांनी
पत्रकात म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Home Remedies For Swollen Feet | पायांची सूज होईल दूर, फक्त करा ‘हे’ 5 घरगुती उपाय…

Anti Aging Tips | ‘या’ 5 गोष्टी हिरावून घेतात तुमचे सौंदर्य, वयाच्या 24 व्या वर्षी तुम्ही दिसता 34 सारखे.. त्यामुळे आजच करा हे उपाय…!

How To Get Rid Of Belly Fat | हिवाळ्यात ‘या’ 6 गोष्टींचा करा आहारात समावेश, चरबी वितळेल अगदी लोण्यासारखी…

Pune Pimpri Chinchwad Crime News | आय टी इंजिनिअरला सायबर चोरट्यांकडून गंडा, एका पोलीस अधिकाऱ्याचे नाव वापरत २६ लाखांची फसवणूक

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case | Satish Wagh was killed by paying a supari of 5 lakhs; Out of the five accused, 3 accused were detained by the police; Neighbor committed act due to personal dispute (Video)

Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांची हत्या 5 लाखांची सुपारी देऊन; पाच आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; शेजारी राहणार्‍याने वैयक्तिक वादातून केले कृत्य (Video)