Pune Pimpri Chinchwad Crime News | वाद मिटवणे पडले महागात, तरुणाला लोखंडी रॉड व दगडाने मारहाण; पेरणे फाटा येथील प्रकार

लोणीकंद : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | भावाला शिवीगाळ करीत असल्याने वाद मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणाला चार जणांनी लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार गुरुवारी (दि.1) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास हवेली तालुक्यातील पेरणे गावच्या हद्दीतील मोकळ्या ग्राउंडवर घडला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत रोहित बाळासाहेब गरजे (वय-20 रा. लक्ष्मी नगर, पेरणे फाटा, ता. हवेली) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन शुभम बाळासाहेब काकडे, योगेश बाळासाहेब काकडे, सुरज काकडे व निखील लोंडे (सर्व रा. रामनगर, वढु खुर्द, ता. हवेली) यांच्यावर आयपीसी 3023, 324, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ अनिकेत गरजे याला आरोपी शिवीगाळ करत होते. त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी रोहित त्याठिकाणी गेला होता. त्यावेळी आरोपी शुभम काकडे याने रोहितचा गळा आवळून अनिकेत याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तर योगेश काकडे याने फिर्यादी यांना लोखंडी रॉडने मारहाण करुन त्यांच्या भावाला हाताने मारहाण केली. तसेच सुरज याने त्याठिकाणी पडलेला दगड उचलून फिर्यादी याच्या भावाला मारहाण करुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

भावावर कात्रीने वार

घरगुती भांडणातून भावानेच भावावर कात्रीने वार करुन जखमी केल्याची घटना मार्केटयार्ड परिसरातील भुसार मार्केट
येथे गुरुवारी (दि.1) सकाळी सातच्या सुमारास घडली. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी रवी हरी पवार (वय-40 रा. गेट नं. 5 समोरील फुटपाथ) याच्यावर आयपीसी 324, 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जितू हरी पवार याने फिर्याद दिली आहे.

आरोपी आणि फिर्य़ादी सख्खे भाऊ असून फुलाचे हार बनवण्याचा व्यवसाय आहे.
त्यांच्यामध्ये घरगुती कारणावरुन वारंवार वाद होत असतात. गुरुवारी आरोपी रवी हा दारु पिऊन आला.
त्याने घरगुती भांडणाच्या रागातून जितू याला शिवीगाळ करुन कात्रीने पोटावर वार करुन जखमी केले.
पुढील तपास पोलीस हवालदार अशोक हिरवाळे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Firing In Police Station | भाजप आमदाराचा शिंदे गटाच्या नेत्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार, जमिनीच्या वादातून गोळीबार (Video)

बोपदेव घाटात विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Pune News | मराठा समाज मागासलेपण पडताळणी सर्वेक्षण ! पुणे महापालिकेच्या हद्दीत 14 लाख 30 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण