Pune Pimpri Chinchwad Crime News | चाकणमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन मुलींची सुटका; एकाला अटक

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने घरात सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा (Sex Racket) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पथकाने दोन महिलांची सुटका करुन एकाला अटक केली आहे. ही कारवाई खेड तालुक्यातील मेदनकरवाडी येथे शनिवारी (दि.6) दुपारी साडे चारच्या सुमारास करण्यात आली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबबत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस हवालदार मारुती महादेव करचुंडे (वय-38) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सचिन मोतीरामजी बोराडे (वय-35 रा. फ्लॅट नं. 401, डी विंग, अविनाश प्राईड, मेदनकरवाडी, चाकण) याच्यावर आयपीसी 370 (3) सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 4, 5 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेदनकरवाडी येथे वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक
प्रतिबंध कक्षाच्या पथकाला मिळाली. पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर, या ठिकाणी छापा टाकला.
आरोपी पीडित दोन तरुणींकडून वेश्याव्यवसाय करुन घेत होता. आरोपी दोन तरुणींना पैशांचे आमिष दाखवून
त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेऊन यातून मिळणाऱ्या पैशांवर स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे पोलीस
तपासात समोर आलं आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे युनुस मुलाणी करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

नायजेरियनाकडून अमली पदार्थ आणुन विकणार्‍या दोघांना अटक

Maharashtra Police News | पोलीस सेवेत उत्कृष्ट कामगिरी केलीय; मग पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्हासाठी अर्ज केलात का

Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळवर गोळीबार करणार्‍यांनी दिल्या गुंडाच्या नावाने घोषणा; मामाच्या वादाचा बदल्याबाबत पोलिसांना संशय

Creative Foundation Pune | साधनांची कमतरता नाही गरज संस्कारक्षम पिढी घडविण्याची – चंद्रकांत पाटील

Pune Police Mcoca Action | मुंढवा परिसरात दहशत पसरवणाऱ्या सुमित उर्फ लखन गौड टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 112 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA