Pune Pimpri Chinchwad Crime News | तळेगाव दाभाडे : PMPML बसच्या वाहक व चालकाची मुजोरी, सुट्या पैशांवरून महिलेसोबत वाद घालून गैरवर्तन; दोघांना अटक

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | सुट्ट्या पैशांवरुन महिला आणि पीएमपीएमल बस (PMPML Bus) चालक व वाहक यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी वाहकाने महिलेचा व्हिडिओ काढत असताना महिलेने विरोध केला असता तिच्यासोबत गैरवर्तन केले. तसेच इतर प्रवाशांना सोडून चालक व वाहकाने महिलेला डेपोत नेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी चालक व वाहक यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत एका महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली. यावरून नवनाथ व्यंकटराव ढगे (वय-28 रा. मोईगाव, चिखली निघोजे रोड, पुणे), मुजा गणपती लुट्टे (वय-30 रा. निसर्ग हौसिंग सोसायटी, रुपीनगर, निगडी) यांच्यावर आयपीसी 363, 354, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.28) रात्री नऊच्या सुमारास स्टेशन चौकात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला तळेगाव स्टेशन चौकातून निगडीला जाणाऱ्या पीएमपीएमएल बसमध्ये
बसल्या. आरोपी वाहक नवनाथ ढगे याने महिलेकडे तिकीटाचे पैसे मागितले. मात्र महिलेने सुट्टे पैसे दिले नाहीत.
त्यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी ढगे याने महिलेचा व्हिडिओ त्याच्या मोबाईल मध्ये काढत होता.
आरोपी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत असल्याचे पाहून महिला त्याच्या अंगावर धावून गेली.
माझा व्हिडिओ का काढतो अशी विचारणा महिलेने केली. त्यावेळी आरोपीने महिलेला जवळ ओढून महिलेसोबत अश्लील वर्तन केले. यानंतर आरोपींनी बस मधील इतर प्रवाशांना उतरवून पीडित महिलेला जबरदस्तीने बसमध्ये बसवून ठेवत तिला डेपोत नेण्याचा प्रयत्न केला. महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prakash Ambedkar | मराठा आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांचे महत्वाचे वक्तव्य, ”शिंदे-जरांगेंमधील कराराने २ बळी घेतले, एक भाजपचा अन्…”

Bachchu Kadu | बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर! म्हणाले, ”पंतप्रधान आवास योजनेत दुजाभाव, ग्रामीण भागावर अन्याय…”