Pune Pimpri Chinchwad Crime News | तरुणीची छेड काढून विनयभंग करणाऱ्या रोडरोमिओला तळेगाव दाभाडे पोलिसांकडून अटक

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन –Pune Pimpri Chinchwad Crime News | कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीचा पाठलाग करुन तिला अश्लील शिवीगाळ करणाऱ्या रोडरोमिओला पोलीसांनी अटक केली आहे. हा प्रकार 5 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान म्हाळस्करवाडी ते इंद्रायणी कॉलेज रोडवर घडला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणावर विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा दाखल करुन बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पीडित तरुणीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून दस्तगीर साहेबखान पठाण (वय-24 रा. रहाटणी मुळ रा. मु.पो. वाडवाना ता. उदगीर जि. लातुर) याच्यावर आयपीसी 354, 354ड, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी इंद्रायणी कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.
फिर्यादी कॉलेजला जाताना येताना आरोपीने त्याच्या दुचाकीवरुन (एमएच 24 बी.क्यु. 0628) पाठलाग केला.
तसेच फिर्यादी यांचा पाठलाग करुन अश्लील शिवीगाळ केली. कॉलेजला जात असताना भररस्त्यात अचानक हात
पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
तसेच ‘तु कोठेही गेली तरी तुला सोडणार नाही, तुला बघून घेतो’ अशी धमकी दिली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

अफ्रिकन नागरिकाकडून मेफेड्रोन व मेथाक्युलोन अंमली पदार्थ जप्त, पुणे गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : मंडळ अधिकाऱ्यांकडे केलेला हरकत अर्ज मागे घेण्यासाठी खंडणीची मागणी, दोघांवर FIR

चालकाला कोयत्याने मारहाण करुन लुटले, दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; भोसरी येथील घटना

Radha Krishna Vikhe Patil | तलाठी भरती : मंत्री राधाकृष्ण विखे यांचा विरोधकांना थेट इशारा, सरकारची बदनामी केली तर गुन्हे दाखल करू!

Comedian Navin Prabhakar | कॉमेडियन नवीन प्रभाकर याचा 14 जानेवारीला खास शो रंगणार

Congress Mohan Joshi On Pune Metro | मेट्रो मार्ग तातडीने पूर्ण करा ! संयमाचा अंत पाहू नका, विमानतळापर्यंत मेट्रो सेवा करा – माजी आमदार मोहन जोशी