Pune Pimpri Chinchwad Crime News | दीडशे रुपये मोबदला देऊन तरुणाचे साडे तेरा लाख हडपले, हडपसर मधील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून दिलेला टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सायबर चोरट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत मांजरी परिसरात राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद
दिली आहे. सायबर चोरट्यांनी फिर्यादी याला पार्ट टाई जॉब ‘वर्क फ्रॉम होम’द्वारे चांगले पैसे कमावता येतील असा
मसेज व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला. दिलेला टास्क पूर्ण केल्यानंतर चांगला परतावा मिळेल आणि हे काम तुम्ही घरी बसून
करु शकता असे आमिष दाखवले. तरुणाने होकार दिल्यानंतर त्याला एका टेलिग्राम ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यात आले. त्यानंतर वेगवेगळे टास्क तरुणाला देण्यात आले.

तरुणाने टास्क पूर्ण केल्यानंतर दीडशे रुपये देऊन त्याचा विश्वास संपादन केला.
यानंतर पैशांची गुंतवणूक केल्यास यापेक्षा जास्त परतावा मिळेल असे आमिष दाखवून तरुणाला 13 लाख 66 हजार 747
रुपये भरण्यास भाग पाडले. पैसे भरल्यानंतर परतावा न मिळाल्याने तरुणाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
सायबर पोलिसांनी हा गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.
पोलिसांनी आयटी अ‍ॅक्ट नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप शिवले करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा जोरदार टोला, ६५ वर्षांचे अजितदादा सिनिअर सिटिझन, कधी निवृत्ती घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक विषय

Congress Leader Prithviraj Chavan | पृथ्वीराज चव्हाणांचे आमदार अपात्रतेवर मोठे भाष्य, पहिला भूकंप नार्वेकरांच्या निर्णयानंतर, पण ते अंग काढून…

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला, ‘खोट्याच्या कपाळी गोटा’ हे येत्या निवडणुकीत कोकणी माणसं खरं करतील