CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला, ‘खोट्याच्या कपाळी गोटा’ हे येत्या निवडणुकीत कोकणी माणसं खरं करतील

राजापुर : प्रभु रामाचा धनुष्यबाण, शिवसेनेचा धनुष्यबाण, बाळासाहेबांचा धनुष्यबाण आपल्याकडे आहे. खरी शिवसेना (Shivsena) आपली आहे. खोट्याच्या कपाळी गोटा हे खरं असून कोकणी माणसं येत्या निवडणुकीत (Maharashtra Election) खरं करतील. विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही. आम्ही तत्वांशी लढाई केली. मला काय मिळेल यापेक्षा राज्याला, शिवसेनेला काय मिळेल याचा विचार केला, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (CM Eknath Shinde On Uddhav Thackeray) लगावला. ते राजापुरात आयोजित शिवसंकल्प अभियान-मेळाव्यात बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, दीड वर्षांपूर्वी सर्वांच्या आशीर्वादाने आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर संपूर्ण राज्यात अनेक दौरे केले. यावेळी सगळेच लोक सांगत होते की शिवसेना संघटनसाठी वेळ दिला पाहिजे. मी जेव्हापासून मुख्यमंत्री झालो, तेव्हापासून प्रत्येक कार्यक्रमाला जात आहे.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, कोकणी माणसाने बाळासाहेबांवर जिवापाड प्रेम केलं. ज्यांनी बाळासाहेबांवर, शिवसेनेवर प्रेम
केलं त्यांच्याबरोबर बोलण्याची संधी मिळाली याचं समाधान आहे.
मुंबई, ठाणे शिवसेनेचे शरीर, तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे शिवसेनेची दोन फुफ्फुसं आहेत.
शिवसेना, मोठी झाली आणि वाढली. म्हणून शिवसेनेचा कोकण हा बालेकिल्ला आहे.

(CM Eknath Shinde ) एकनाथ शिंदे म्हणाले, उदय सामंत, दिपक केसरकरांनी मंत्रीपदे सोडली. मी नगरविकास मंत्री होतो.
आठ-आठ मंत्री माझ्यासोबत होते. धनुष्यबाण आणि शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं.
विकासाच्या विरोधात भूमिका घेऊ लागले. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला.

एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेबांनीही त्यांच्या काळात लोकांना मोठं केलं. परंतु, स्वार्थासाठी, मोहापायी, खुर्चीसाठी विचार,
भूमिका आणि राज्यातील तमाम जनतेच्या भावनांना मुरड घालून जे काही झालं ते अघटित झालं.
मी एवढंच सांगतो की कोकणी माणसाचं बाळासाहेबांशी अतुट नातं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, वाकड पुलावरील घटना

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

नायजेरियनाकडून अमली पदार्थ आणुन विकणार्‍या दोघांना अटक

Maharashtra Police News | पोलीस सेवेत उत्कृष्ट कामगिरी केलीय; मग पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्हासाठी अर्ज केलात का

Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळवर गोळीबार करणार्‍यांनी दिल्या गुंडाच्या नावाने घोषणा; मामाच्या वादाचा बदल्याबाबत पोलिसांना संशय

Creative Foundation Pune | साधनांची कमतरता नाही गरज संस्कारक्षम पिढी घडविण्याची – चंद्रकांत पाटील

Pune Police Mcoca Action | मुंढवा परिसरात दहशत पसरवणाऱ्या सुमित उर्फ लखन गौड टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 112 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

भांडण सोडवणाऱ्या तरुणाला काचेच्या बाटलीने मारहाण, तिघांवर FIR; हिंजवडी मधील घटना